(Image Credit : www.popsci.com)
जर तुम्हाला काही वेळातच थकवा येत असेल, जर तुम्हाला फार जास्त ताण जाणवत असेल आणि छोट्या छोट्या गोष्टींवर हायपर होत असाल तर तुमच्या शरीरात एका महत्त्वपूर्ण व्हिटॅमिनची कमतरता असू शकते. ते व्हिटॅमिन म्हणजे अॅटी स्ट्रेस म्हणून ओळखलं जाणारं व्हिटॅमिन बी १२ आहे. बी १२ व्हिटॅमिन शरीरालाच ऊर्जा देण्याचं काम करतं. या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे अनेक आजार होऊ शकतात.
गरजेचं आहे व्हिटॅमिन बी १२
१) शरीराला ऊर्जा देणारं व्हिटॅमिन बी १२ शरीराचं तापमान नियंत्रित ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतं.
२) शरीरात लाल रक्तपेशी तयार करण्यात व्हिटॅमिन बी १२ महत्त्वाची भूमिका बजावतं.
३) हे व्हिटॅमिन शरीराच्या वेगवेगळ्या भागांसाठी प्रोटीन तयार करण्याचं काम तर करतं.
४) व्हिटॅमिन बी १२ जन्मासंबधी विकारांचा विकास रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण तत्व आहे.
का होते व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता?
व्हिटॅमिन बी १२ शरीरात कमतरचा होण्याची अनेक कारणे आहेत. खाण्या-पिण्याचा बदलत्या सवयी, केमिकल्सचं अधिक सेवन हे याचं महत्त्व कारण आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या एका शोधानुसार, भारतातील जवळपास ६० ते ७० टक्के लोकसंख्या आणि शहरी मध्यमवर्गातील ८० टक्के लोकसंख्या व्हिटॅमि बी १२ कमी असल्याने ग्रस्त आहेत.
मांसाहारा व्यतिरिक्त आहेत पर्याय
असे अजिबात नाहीये की, मांसाहार करत असलेल्या लोकांना अधिक प्रमाणात व्हिटॅमिन्स मिळतात. शाकाहारी लोकही मोड आलेल्या डाळी, दूध उत्पादने, दही, पनीर, चीज, सोया मिल्क इत्यादींमधून तसेच बटाटे, गाजर, मुळे यांपासूनही बी १२ व्हिटॅमिन मिळवू शकतात.