कोरोना व्हायरसचा प्रसार आटोक्यात येत नसून वाढत चालला आहे. त्यामुळे कोरोनाला हरवण्यासाठी सर्वच देशातील शास्त्रज्ञ प्रयत्न होत आहे. प्रयागराजमधील (IIT) च्या विद्यार्थ्यांनी कोरोनाच्या औषधांबाबत संशोधन केलं आहे. ट्रिपल आई टी अप्लाइड साइंसेस विभागाचे अध्यक्ष डॉ. प्रीतिश भरद्वाज यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार तीन वेगवेगळ्या औषधांनी कोरोनाचे उपचार केले जाऊ शकतात. हे संशोधन टेलर ऐंड फ्रांसिस समुहाच्या रिसेप्टर्स आणि सिग्नल ट्रांसडक्शन जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.
यातील माहितीनुसार कोरोना व्हायरस जगभरातील लोकांसाठी माहामारी बनलेला आहे. या आजारामुळे श्वसन तंत्रात बिघाड उद्भवतो. जगभरातील वेगवेगळ्या प्रयोगशाळामध्ये या आजाराच्या औषधांवर प्रयोग सुरू आहेत. ट्रिपल आईटीने सुद्धा या संसर्गजन्य आजाराबाबत उपाय शोधण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत.
या संशोधनात १५०० औषधांवर परिक्षण करण्यात आले. ही औषधं व्हायरस, बॅक्टेरिया, कॅन्सरचे विषाणू, मलेरिया यांविरुद्ध लढण्यासाठी परिणामकारक ठरली होती. त्यातील मुख्य प्रोटीज कॉम्प्लेक्स आणि NSP/NSP10 मिथाइल ट्रांसफेरेज कॉम्प्लेक्सची निवड करण्यात आली आहे. या संशोधनातून दिसून आलं की, तेलबिवुडिन (एँटीव्हायरल), ऑक्सीटेट्रासाइक्लिन डिहाइड्रेट (एँटीव्हायरल), मिथाइल गैलेट (एँटीमलेरिअल) मिथाइलट्रांस्फेरेज को रोकता है और मेरोपेनम (एँटीबॅक्टीरियल), साइक्लोसिटीडीन हाइड्रोक्लोराइड (एँटीव्हायरल), ट्राई फ्लूरो डाइन (एँटीव्हायरल) या औषधांतील घटक एकत्र करून कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी वापरल्यास प्रभावी ठरू शकतात.
आता कोविड 19 संक्रमित रुग्णांच्या उपचारांसाठी एँटी व्हायरल आणि एँटी मलेरिअल या औषधांच्या मिश्रणाचा वापर केला जात आहे. या संशोधनात अलीगढ मुस्लिम युनिव्हरसिटी (एएमयू) मधील संतोष कुमार मौर्य यांनी योगदान दिले आहे.
रोजच्या चुकांमुळे कमी होत आहे रोगप्रतिकारकशक्ती; माहीत करून घ्या आहाराबात 'या' गोष्टी
Unlock 1.0: मॉल-मंदिर किंवा ऑफिसमधून आल्यावर घरात कपड्यांना 'असं' करा सॅनिटाइज...