शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

Covishield: डेल्टा व्हेरिअंट 'बकासूर'! कोव्हिशिल्ड घेतलेल्यांना तिसरा डोस द्यावा लागेल; ICMR चा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2021 12:28 PM

Covishield third dose: कोरोना व्हायरसचा डेल्टा व्हेरिअंट (Corona Delta variant) तिसऱ्या लाटेसाठी कारणीभूत ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लसीपासून निर्माण झालेल्या अँटिबॉडी (Antibody) हा डेल्टा स्ट्रेन वेगाने संपवत असल्याचे समोर आले आहे.

पुणे/ नवी दिल्ली: कोरोना व्हायरसचा डेल्टा व्हेरिअंट (Corona Delta variant) तिसऱ्या लाटेसाठी कारणीभूत ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लसीपासून निर्माण झालेल्या अँटिबॉडी (Antibody) हा डेल्टा स्ट्रेन वेगाने संपवत असल्याचे समोर आले आहे. आयसीएमआर (ICMR) ने केलेल्या अभ्यासात कोव्हिशिल्ड (Covishield) घेतलेले लोक डेल्टा कोरोना व्हायरसमुळे संक्रमित होत आहेत. यामुळे त्यांच्या शरीरात तयार झालेली अँटिबॉडी कमजोर पडू लागली आहे. यामुळे या लोकांना तिसरा डोस दिला जावा असा सल्ला संशोधक देत आहेत. (ICMR says Antibody drop against Delta in vaccinated may suggest need for third dose who got covishield.)

 बापरे! चार आठवड्यांत ३० देशांत पसरला; डेल्टा पेक्षाही खतरनाक Lambda Variant ची दस्तक

D614G म्यूटेशनच्या जुन्या व्हायरसच्या तुलनेत डेल्टा व्हेरिअंट कोव्हिशिल्डच्या पहिल्या डोसपासून बनलेली अँटीबॉडी 4.5 पटींनी आणि दुसऱ्या डोसपासून बनलेली अँटीबॉडी 3.2 पटींनी कमी करतो. आयसीएमआरचे महामारी आणि संक्रमण विभागाचे प्रमुख डॉ. समीरन पांडा यांनी सांगितले की, या प्रकाराच्या माहितीमुळे लसीकरण अभियानाची रणनीती ठरविण्यास मदत मिळणार आहे. यामुळे तिसरा डोस द्यायचा की नाही, कोणाला द्यायचा याची गरजही लक्षात येणार आहे.

आयसीएमआरने केलेल्या अभ्यासानुसार, ज्यांना कोरोना झाला त्यांच्यात कोरोना व्हायरसने लसीच्या पहिल्या डोससारखे काम केले. कोरोना झालेल्या ज्या लोकांनी दोन डोस घेतले त्यांच्याच तीन वेळा अँटिबॉडी तयार झाल्या. अशाचप्रकारे जे कोरोना संक्रमित झाले नव्हते त्यांनी कोव्हिशिल्डचे एक किंवा दोन डोस घेतले व संक्रमित झाले, त्यांच्यातही अंटिबॉडी मोठ्या प्रमाणावर तयार झालेली आढळल्याचे डॉ. पांडा  यांनी सांगितले. 

Corona Vaccine : मोठा दिलासा! कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यास मृत्यूचा धोका 95 टक्क्यांपर्यंत कमी; ICMR च्या रिसर्चमधून खुलासा

मात्र, ज्या लोकांनी कोव्हिशिल्डचे दोन डोस घेतलेत आणि ते घेण्यापूर्वी किंवा नंतर कोरोना संक्रमित झालेले नाहीत त्यांना तिसरा डोस घेण्याची गरज भासणार आहे. तरच त्यांच्यात तीनवेळा अँटिबॉडी तयार झालेल्या लोकांएवढी अँटिबॉडी तयार होईल, असेही पांडा यांनी म्हटले आहे. डॉ. यादव यांनी सांगितले की, ज्यांना नुकताच कोरोना होऊन गेला आहे, त्यांना लसीचा एकच डोस पुरेसा आहे. परंतू जे कधीच संक्रमित झालेले नाहीत, त्या लोकांमध्ये कोव्हिशिल्डमुळे अँटिबॉडी विकसित झाली आहे. यातही काही मोजक्याच लोकांमध्ये लस घेतल्यानंतर अँटिबॉडी तयार झालेली नाही.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस