नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासगी रुग्णालयांनी गर्भवती महिलांसाठी दर महिन्याच्या ९ तारखेला मोफत तपासणी आयोजित करावी या आवाहनाला प्रतिसाद देत अपोलो हॉस्पिटलचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रताप रेड्डी यांनी अपोलोच्या देशभरातील सर्व ६४ हॉस्पिटल्समध्ये प्रत्येक महिन्याच्या ९ तारखेला गर्भवती महिलांचे मोफत तपासणी शिबिर आयोजित केले आहे. माता-मृत्यू व बालमृत्यूचे प्रमाण कमी व्हावे आणि गर्भवती महिलांना आरोग्यविषयक मार्गदर्शन मिळावे तसेच सुदृढ बालक जन्माला यावे यासाठी सदर योजना अपोलो हॉस्पिटल, नाशिकने आयोजित करत असून, ९ जुलैपासून प्रत्येक महिन्याच्या ९ तारखेला गर्भवती महिलांकरिता स्त्रीरोग तज्ज्ञांकडून मोफत तपासणी शिबिर आयोजित केले जाणार आहे. या शिबिरात हिमोग्लोबीन, रक्ताच्या आणि लघवीच्या तपासण्या इ. मोफत करण्यात येणार आहेत. महिलांना यासाठी अपोलो हॉस्पिटल्स नाशिक, स्वामिनारायणनगर, आडगाव नाका, नाशिक. फोन २५१०२५० येथे संपर्क करण्याचे आवाहन अपोला हॉस्पिटलतर्फे करण्यात आले आहे.
अपोलो हॉस्पिटलतर्फे शनिवारी गर्भवतींची मोफत तपासणी
By admin | Published: July 07, 2016 10:15 PM