फिट अन् हेल्दी राहणं फक्त आपल्या आरोग्यासाठीच नाही तर आपल्या दिसभर एनर्जेटिक राहण्यासाठीही मदत करतं. अनेकदा वेळेची कमतरता किंवा आरोग्याच्या समस्यांमुळे अनेक लोक वजन कमी करू शकत नाहीत. आज आम्ही तुम्हाला आज एका अशा सिम्पल गोष्टीबाबत सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही अगदी सहज वजन कमी करू शकता. वजन कमी करण्याचा सहज-सोपा उपाय म्हणजे, सफरचंद आणि मधाचा उपाय...
वजन कमी न झाल्यामुळे महिलांना येतो स्ट्रेस
अनेक संशोधनांमधून सिद्ध झाल्यानुसार, महिलांना वाढलेलं वजन कमी न झाल्यामुळे स्ट्रेस आणि डिप्रेशनच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. कारण त्या आपल्या लूकबाबत फार कॉन्शिअस असतात. पण तरिसुद्धा त्या वाढलेलं वजन कमी करण्यासाठी सोपा उपाय शोधत असतात.
वजन कमी करण्यासोबतच डायजेशनसाठी सर्वात फायदेशीर ठरतं सफरचंद
अॅपल म्हणजेच सफरचंद डॉक्टरांपासून दूर राहण्यासाठी मदत करतो. मिनरल्स, प्रोटिन्स, अॅन्टीऑक्सिडंट्स आणि फायबरयुक्त सफरचंद सर्वात हेल्दी फळांपैकी एक आहे, जे वजन कमी करण्यासाठी सर्वात फायदेशीर ठरतं. सफरचंद वजन कमी करण्यासोबतच ब्रेन हेल्थसाठी उत्तम असतं आणि डायजेशनसाठीही मदत करतं. दररोज सफरचंद खाल्याने डायबीटीस आणि कॅन्सर यांसारखे आजारही दूर राहतात.
वजन कमी करण्यासाठी फायदेशीर मध
जेव्हा गोष्ट वजन कमी करण्याची असते. तेव्हा मध अत्यंत लाभदायक ठरतं. मधामध्ये आर्टिफिशिअल स्वीटनर अजिबात नसतं. म्हणजेच, मध नैसर्गिकरित्या गोड असतं. त्यामुळे दररोज मध खाल्याने स्वीट क्रेविंग्स दूर होते आणि शरीराला आवश्यक पोषक तत्व मिळण्यास मदत होते. तुम्ही दररोज सकाळी गरम पाण्यामध्ये लिंबू आणि मध एकत्र करून वजन कमी करू शकता.
(Image Credit : https://tasteforlife.com)
सफरचंद आणि मध एकत्र खा
सफरचंद आणि मध एकत्र खाल्याने वजन वेगाने कमी होण्यासाठी मदत मिळते. त्यासाठी तुम्ही एक सफरचंद क्रश करा आणि त्यामध्ये मध एकत्र करून खा. तुम्ही सफरचंदाच्या फोडी करू त्या मधासोबत खाऊ शकता. मध आणि सफरचंद एकत्र खाल्याने फक्त स्विट क्रेविंग दूर होत नाही तर बराच वेळ पोट भरल्याप्रमाणे वाटतं. तसेच कॅलरी कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठीही मदत होईल.
टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातूना आम्ही कोणताही दावा करत नाही. कारण प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुले कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.