हे तर सगळ्यांना माहीत आहे वेगवेगळ्या फळांचे आरोग्याला अनेक फायदे मिळतात. जर तुम्ही योग्य फळांची निवड केली तर हृदयरोगाचा धोकाही टळू शकतो. असंच एक फळ म्हणजे सफरचंद. सफरचंदमध्ये पोषक तत्व, फायबर आणि व्हिटॅमिन सी भरपूर असतं. जे हृदय निरोगी ठेवण्यासाठी मदत करतात. तुम्ही रोज एक सफरचंद खाल्लं पाहिजे. कारण याच्या सेवनाने अनेक फायदे मिळतात. वेट लॉस, डायबिटीस, बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासही मदत मिळते.
कॅलरी कमी असतात
हृदय निरोगी ठेवण्यासाठी लो कॅलरी डाएट फायदेशीर असते आणि सफरचंदात कॅलरीचं प्रमाण कमी असतं. एका मध्यम आकाराच्या सफरचंदमध्ये 100 कॅलरी असतात. हे एक असं फळ आहे ज्यात कमी कॅलरीसोबतच फायबर, व्हिटॅमिन आणि इतर पोषक तत्व असतात. जे हृदय निरोगी ठेवण्यासाठी मदत करतात.
बॅड कोलेस्ट्रॉलला कंट्रोल करतं
सफरचंदामध्ये अॅंटी-ऑक्सिडेंट भरपूर असतात. ओहियो स्टेट यूनिव्हर्सिटीच्या एका रिसर्चमध्ये आढळून आलं की, चार आठवडे जर दररोज एक सफरचंद खाल्लं तर बॅड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी होऊ शकतं. सफरचंदात पॉलीफेनोल्स नावाचं अॅंटी-ऑक्सिडेंट असतं. जे हृदयासाठी चांगलं असतं.
हृदयरोगाचा धोका कमी
सफरचंदात असलेले फायबर, व्हिटॅमिन आणि इतर पोषक तत्व आरोग्यासाठी फार महत्वाचे असतात. खासकरून हृदयासाठी. एका शोधात असं आढळलं की, दररोज 100 ते 150 ग्राम सफरचंद खाल्ल्याने हृदयरोगाचा धोका कमी होतो. तसेच यातील फायबरमुळे ब्लड प्रेशरही कंट्रोल करतं.
वजन कमी होतं
तुमचं वजन आणि हृदयाचं आरोग्य यांचं फार खोलवर नातं असतं. जर तुमचं वजन जास्त असेल हे तुमच्या हृदयासाठी फारच घातक ठरू शकतं. वजन वाढल्यावर हृदयरोगाच्या वेगवेगळ्या समस्या होऊ लागतात. अशात वजन कमी करण्यासाठी तुम्ही नियमितपणे सफरचंद खाऊ शकता.
डायबिटीस कंट्रोल करतं
डायबिटीसच्या रूग्णांना हृदयरोगाचा धोका आणखी जास्त असतो. अशात सफरचंदचं सेवन करून तुम्ही डायबिटीस कंट्रोलमध्ये ठेवू शकता. यात फायबर आणि अॅंटी-ऑक्सिडेंटचं प्रमाणही अधिक असतं. डायबिटीसच्या रूग्णांसाठी सफरचंद फार फायदेशीर असतं. याच्या नियमित सेवनाने डायबिटीस वाढण्याचा धोकाही कमी होतो.