Heart Pumping : हृदयाचं पंप योग्यपणे काम करण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतात. जेणेकरून ब्लड सर्कुलेशन योग्यपणे व्हावं. यासाठी एक्सपर्ट सांगतात की, रोज एक सफरचंद खावं. कारण हृदयासाठी हे फळ फार फायदेशीर आहे. तसेच दररोज शारीरिक हालचाल करावी आणि तणाव घेणं सोडलं पाहिजे.
हृदयाची धडधड बरोबर होणं ही एक हेल्दी हार्टची ओळख आहे. जेवढ्या वेळ हार्ट पंप करतो, तेवढ्या वेळा आपल्या धडधड ऐकू येते. जेव्हा हृदयाचे चेंबर काम करणं बंद करतात तेव्हा पंपींग स्लो होतं. ज्यामागे कार्डियोवस्कुलर डिजीज असतो.
शरीरात कमी होईल ऑक्सीजन
ऑक्सीजन घेण्याचं काम फुप्फुसं करतात, पण शरीराच्या कानाकोपऱ्यात ते हृदय पोहोचवतं. ऑक्सीजन असलेलं रक्त हृदय शरीरातील सगळ्या अवयवांना पोहोचवतं. पंपिंग कमी झाल्यामुळे या अवयवांपर्यंत ऑक्सीजन पोहोचत नाही.
हार्ट पंपिंग वाढण्यासाठी खा हे फळ
हृदयाच्या रूग्णांसाठी सफरचंद हे चांगलं फळ आहे. दररोज नाश्ता आणि लंचच्या मधल्या वेळेत हे फळ खावं. Pubmed वर 2013 मध्ये प्रकाशित शोधानुसार, हे फळ खाल्ल्याने हृदयरोगाचा धोका कमी होतो आणि हृदय निरोगी राहतं.
अमेरिकन हार्ट असोसिएशन जास्त धोका वाढल्यावर सतत डॉक्टरांचा सल्ला फॉल करण्यास आणि हार्ट फेलिअरच्या कोणत्याही संभावित कारणाला ठीक करण्यास सांगतात. पण त्यासोबतच दररोज योग्य प्रमाणात शारीरिक हालचाल करत रहा. याने हृदयाचं काम चांगलं होतं.
सोडिअममुळे शरीरात जमा होईल पाणी
कधीही प्रमाणापेक्षा जास्त मीठ म्हणजे सोडिअमचं सेवन करू नये. यामुळे शरीराच्या वेगवेगळ्या भागात पाणी जमा होऊ लागतं आणि याच कारणाने हृदयावर दबाव पडू लागतो.
तणाव घेणं सोडा
आपल्याला कळतच नाही की, स्ट्रेस कधी शरीरासाठी घातक ठरू शकतो. त्यामुळे जास्त तणाव घेऊ नका आणि येऊ देऊ नका. यामुळे हृदयाचं काम बिघडतं आणि पंपिंग कमी होते.
वजन कमी करा
जर तुमचं वजन सतत वाढत असेल तर याकडे दुर्लक्ष करू नका. हार्ट पंप योग्यपणे होण्यासाठी वजन कंट्रोलमध्ये ठेवणं फार गरजेचं आहे. लठ्ठपणामुळे हृदयासंबंधी अनेक आजार होतात.
या गोष्टी सोडा
मद्यसेवन, सिगारेट, विडी आणि मादक पदार्थ तुमची हृदयाची धडधड नेहमीसाठी बंद करू शकतात. त्यामुळे हृदयाला नुकसान पोहोचणाऱ्या या गोष्टींपासून दूर राहिलं पाहिजे.