वजन कमी करणारे (Weight Loss) लोक बटाटे खाणं टाळतात. बटाट्याची भाजी असो वा वेगळे पदार्थ लोक ते खात नाहीत. कारण हार्ट कार्ब असलेला बटाटा त्यांना सर्वात खराब पर्याय वाटतो. पण अनेकांना हे माहीत नाही की, बटाटे खाऊनही तुम्ही वजन कमी करू शकता. फक्त त्यासाठी बटाटे खाण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहीत असली पाहिजे.
वेट लॉससाठी खा थंड बटाटे
वजन कमी करण्यासाठी तुम्ही थंड बटाटे खायला हवेत. बटाटे उकडून आणि ते थंड करून खा किंवा तुम्ही ते सलाद बनवूनही खाऊ शकता. थंड बटाटे खाण्याचे अनेक फायदे आहेत. थंड बटाट्यात रेजिस्टेंस स्टार्ट असतो. हा एक कार्ब आहे ज्याला एकप्रकारचं फायबरही मानलं जातं. जे आतड्यांमधील बॅक्टेरियासोबतच कोशिकांसाठीही फायदेशीर असतं. याने वजन कमी करण्यात मदत मिळते.
मेटाबॉलिज्म बूस्ट होतं
थंड बटाट्याने मेटाबॉलिज्म चांगलं राहतं. जसे की, बटाट्यात एक रेजिस्टेंस स्टार्च आहे. ज्याने मेटाबॉलिज्म बूस्ट होतं. याने तुम्ही जे काही खाता ते लवकर पचतं आणि वजन कमी होण्यास मदत मिळते.
गट बॅक्टेरिया वाढण्यास मदत
गट बॅक्टेरियामुळे पचनतंत्र चांगलं राहतं. तसेच याने वेट लॉस आणि डायबिटीस कंट्रोल करण्यासही मदत मिळते. याने ब्यूटायरेट उत्पादनास मदत मिळते आणि त्यानेच मोठ्या आतड्यांचं काम वेगाने होतं. याने सूजही कमी होते आणि पचनक्रिया व्यवस्थित होते.
भूक कंट्रोलमध्ये राहते
रेजिस्टेंस स्टार्चमध्ये नियमित स्टार्चच्या तुलनेत कमी कॅलरी असतात आणि याने पोटही भरतं. पोट भरलं असल्याने तुम्ही सतत काही खाणं टाळता. वेट लॉससाठी क्रेविंग आणि भूक कंट्रोल करणं फार गरजेचं असतं. थंड बटाट्याने यास मदत मिळते.