प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील सर्वात वेगळा अनुभव म्हणजे, तिचं गर्भारपणा. बाळाला जन्म देताना आईचाही दुसरा जन्म होतो असं म्हटलं जातं. यामागेही अनेक कारणं आहेत. या अवस्थेतून जात असताना एका महिलेच्या शरीरात अनेक बदल होत असतात. घरामध्येही आपली सून किंवा मुलगी आई होणार असल्याची बातमी येताच तिचं कौतुक करण्यात येतं. तिची काळजी घेण्यात येते. तिला अनेक मोलाचे सल्ले देण्यात येतात. अशातच पहिल्यांदा गरोदरपणाचा अनुभव घेणाऱ्या महिलेच्या मनात अनेक प्रश्न असतात. अनेकदा हा 9 महिन्यांच्या प्रवास त्या महिलेला घाबरवून सोडतो. एवढचं नाही तर इतरांचे गरोदरपणातले अनुभव ऐकून कधी कधी काही महिलांना गरोदरपणाचीच भिती वाटत राहते. अनेकदा ही भिती साधारण असते. पण कधी कधी ही भिती फार गंभीर ठरू शकते. या भितीला वैद्यकिय भाषेमध्ये टोकोफोबिया असं म्हणतात.
इतर महिलांचे अनुभव ऐकून घाबरतात काही महिला
टोकोफोबियाला पॅथॉलॉजिकल फियर म्हणजेच एखाद्या आजाराशी संबंधित भिती असं मानलं जातं. ही भिती एखाद्या महिलेच्या मनात तेव्हाच निर्माण होते जेव्हा ती दुसऱ्या महिलेची प्रसुती होताना पाहते. त्यावेळी त्या महिलेला होणाऱ्या प्रसुती वेदना पाहून ती स्वतः गरोदर राहण्यास घाबरून जाते. एवढचं नाही तर सध्या अनेक महिला सोशल मीडियावर आपला गरोदरपणाचा अनुभव शेअर करत असतात. हा अनुभव वाचल्यानंतरही अनेक महिलांच्या मनात गरोदरपणाबाबत भिती निर्माण होते.
7 टक्के महिला टोकोफोबियाने पीडित
अनेकदा गरोदरपणा हा एखाद्या महिलेच्या जीवनातील अत्यंत सुखद आणि सुंदर अनुभव असला तरीही काही महिलांसाठी मात्र तो त्रासदायक आणि तणावपूर्ण ठरू शकतो. अनेक महिलांना ट्रॉमासारखाही अनुभव येतो. तसं पाहायला गेलं तर ही परिस्थिती फार कमी लोकांबाबत उद्भवते. आणि अशाप्रकारचे प्रकरणं अजुनही पार कमी होतात. एका रिपोर्टनुसार, जवळपास 7 टक्के महिला अशा आहेत की, टोकोफोबिया म्हणजेच बाळाला जन्म देताना वाटणाऱ्या भितीने किंवा ट्रॉमाने पीडित आहेत.
टोकोफोबियाची लक्षणं
सोप्या शब्दांमध्ये सांगायचं झालचं तर, टोकोफोबियाला दोन वेगवेगळ्या प्रकारांमध्ये विभागलं जातं. प्रायमरी आणि सेकंडरी. अशी महिला जीने आधी गरोदरपणाचा अनुभव घेतला नसेल परंतु बाळाला जन्म देणाऱ्या महिलेचा फोटो किंवा व्हिडीओ पाहून घाबरत असेल तर अशा महिलांना प्रायमरी कॅटेगरीमध्ये ठेवलं जातं. प्रायमरी टोकोफोबियाच्या परिणामांना पोस्ट ट्रॉमॅटिक डिसऑर्डरच्या लक्षणांसोबतही तुलना करण्यात येते. तसेच सेकेंडरी टोकोफोबिया तेव्हा होतो जेव्हा एखादी महिला स्वतः कोणत्याही प्रकारच्या ट्रॉमॅटिक बर्थ एक्सपीरियंस किंवा मिसकॅरेज किंवा स्टिलबर्थयांसारख्या समस्यांचा सामना केला असेल तर गरोदरपणाच्या समस्येमध्ये ती महिला ट्रॉमामध्ये जाऊ शकते.
असा करा उपचार
तसं पाहायला गेलं तर अनेक महिला ज्या टोकोफोबियाने पीडित आहेत. त्या स्वतःच या परिस्थितीचा सामना करत असतात. गरोदरपणाच्या दिवसांत त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी त्यांना समजून घेऊन थोडा धीर देण्याची गरज असते. परंतु ट्रॉमॅटिक अनुभवातून जाणाऱ्या महिलांना काउन्सिलिंगची गरज असते. कोणत्याही दुसऱ्या फोबियाप्रमाणे टोकोफोबियाच्या उपचारांमध्ये तज्ज्ञांनाही हे जाणून घेण्याची गरज असते की, नक्की भितीचं मुख्य कारण आहे तरी काय? टोकोफोबियाच्या रूग्णांना डिप्रेशन, एंग्जायटीसारखी लक्षणं दिसली तर त्यांना डायरेक्ट थेरपीची गरज असते.