शहरं
Join us  
Trending Stories
1
हो, मलाही शिंदेंच्या शिवसेनेत सहभागासाठी ऑफर; खासदार राजाभाऊ वाजे यांचा गौप्यस्फोट
2
"बंगाली हिंदू बेघर, छावण्यांमध्ये खिचडी खातायत...!"; प. बंगालमधील हिंसाचारावरून मिथुन यांचा ममतांवर प्रहार, म्हणाले...
3
४३ कोटींचं अपार्टमेंट, २६ लाखांचं गोल्फ किट... कोण आहेत अनमोल सिंग जग्गी? SEBI नं कंपनीवर केली कारवाई
4
आता पहिलीपासूनच इंग्रजीबरोबर हिंदीही सक्तीची, राष्ट्रीय शिक्षण धोरणाची राज्यात यंदापासूनच अंमलबजावणी
5
बँकांनी १६ लाख कोटी रुपयांवर सोडले पाणी; मोठमोठी कर्जे बुडीत खात्यात, पहिल्या क्रमांकावर कोणती बँक?
6
विशेष लेख: राहुल गांधी म्हणतात, ‘वाट बघेन! मला घाई नाही!’
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२५: प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल, एखादी आनंददायी बातमी मिळेल
8
युद्ध फायद्याचे? सेन्सेक्स ७७ हजारांवर, परदेशी गुंतवणूकदारांकडून देशात पैसे गुंतवणे सुरू
9
अग्रलेख: हा कसला आततायीपणा? तामिळनाडूचा निर्णय देशाहिताचा नाही
10
वक्फ सुधारणा कायद्यातील काही तरतुदींना स्थगिती देण्याचा विचार, सर्वाेच्च न्यायालयाने केले स्पष्ट
11
निकाल देईपर्यंत कुणाल कामराला अटक करू नका; शिंदेंवरील आक्षेपार्ह टिप्पणीप्रकरणी हायकोर्टाचा आदेश
12
आरोपींच्या घरांवर बुलडोझर कारवाई; नागपूर महानगरपालिकेने मागितली बिनशर्त माफी
13
टॅरिफ युद्ध शिगेला: अमेरिकेने चीनवर लादले २४५ टक्के आयात शुल्क, डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
14
१७ कोटी जीएसटी भरा; विद्यापीठाला नोटीस, महाविद्यालय संलग्नता शुल्कावर करआकारणी; भुर्दंड विद्यार्थ्यांना?
15
सुपरओव्हरमध्ये दिल्लीचा राजस्थानवर रोमहर्षक विजय!
16
केंद्र सरकारने उचलले मोठे पाऊल! कर्मचारी खर्चात कपात; सुधारणांवर फोकस
17
दस्तनोंदणी दुप्पट; हाताळणी शुल्क ४० रुपये; सरकारला दरमहा मिळतो ४ हजार कोटींचा महसूल
18
राज्यात ‘आनंद गुरुकुल’! सुरू करणार ८ निवासी शाळा, शालेय शिक्षण विभागाचा संकल्प
19
गुरुची विद्या गुरुलाच? ठाकरेंनी आतल्या गोटातून माहिती काढली; भाजपाला शह देण्याची रणनीती आखली
20
अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स कुटुंबासह लवकरच भारत दौऱ्यावर; टॅरिफच्या गोंधळामध्ये पंतप्रधान मोदींशी घेणार भेट

व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी १२ची कमतरता तुम्हाला भासतेय का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 09:08 IST

व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन बी १२ यांची कमतरता भासणे आता सर्वसामान्य झाले आहे. या दोन्ही जीवनसत्वांची उणीव भरून काढण्यासाठी वैद्यकीय उपाय उपलब्ध आहेत. योग्य औषधांमुळे हा त्रास कमी होऊ शकतो...

- डॉ. संपदा संत अधिष्ठाता, आर. ए. पोदार आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालय ल्ली व्हिटॅमिन डी आणि बी १२ची कमतरता भासत असलेले अनेकजण आपल्या आजूबाजूला हमखास दिसतात. प्रत्येकाची जीवनशैली आणि आहाराची पद्धत वेगवेगळी असते. या दोन्हींमधील काही त्रुटींमुळे व्हिटॅमिन डी आणि बी १२ रुसून बसत असतात. त्यांना जागेवर आणण्यासाठी नैसर्गिक आणि वैद्यकीय उपाय उपलब्ध आहेत. 

प्रत्येकाच्या शरीरासाठी कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, मिनरल्स, फॅट्स इत्यादींची जशी आवश्यकता असते, तशीच जीवनसत्त्वांचीही (व्हिटॅमिन्स) गरज असते. पाण्यात आणि चरबीत विरघळणारे अशा दोन प्रकारांमध्ये व्हिटॅमिन्सची विभागणी असते. व्हिटॅमिन डी चरबीत, तर बी १२ पाण्यात विरघळणारे आहे. व्हिटॅमिन डी मुख्यत: सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशातून मिळते. आपल्या त्वचेतील एक रासायनिक प्रक्रिया सूर्याच्या अतिनील किरणांमुळे व्हिटॅमिन डी तयार करते. याशिवाय दुग्धजन्य पदार्थांच्या माध्यमातूनही व्हिटॅमिन डी मिळते. 

कमतरतेची लक्षणे : व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे हाडे दुखणे, अशक्तपणा आणि हाडे ठिसूळ (ऑस्टियोपोरोसिस) होऊ शकतात. तसेच थकवा, मूड स्विंग्ज आणि प्रतिकारशक्ती कमी होते. व्हिटॅमिन बी १२ची कमतरता दुग्धजन्य पदार्थ, वनस्पतीपासून प्राप्त पदार्थ, ओट, मोहरी, गहू, तांदूळ, मका इ. तृणधान्य, सोया, बदाम, पिस्ता, काजू, खजूर, मनुका, अंजीर, भोपळा, सूर्यफुलांच्या बिया, चीज, मशरूम इ. तसेच ब्रेड, काही चॉकलेट यांच्या आहाराच्या माध्यमातूनही भरून काढता येऊ शकते. शाकाहारींमध्ये बी १२ची उणीव अधिक असते. 

कमतरतेची लक्षणे : व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता असल्यास थकवा, अशक्तपणा, चक्कर येणे आणि मानसिक अस्वस्थता दिसू शकते. यामुळे नर्व्हस सिस्टमवरही परिणाम होऊ शकतो, जसे की न्यूरोपॅथी. भारतामध्ये सूर्यप्रकाश कमी असलेल्या ठिकाणी राहणारे किंवा घरामध्ये जास्त वेळ घालविणाऱ्या लोकांसाठी व्हिटॅमिन डीची कमतरता होऊ शकते. याशिवाय, शाकाहारी आहार घेणाऱ्यांना व्हिटॅमिन बी १२ मिळवणे अधिक कठीण होते, कारण याचे मुख्य स्रोत मांसाहार आणि दुग्धजन्य पदार्थ आहेत. त्यामुळे भारतीयांसाठी या दोन्ही व्हिटॅमिन्सचे योग्य प्रमाण आवश्यक आहे. व्हिटॅमिन बी १२ व व्हिटॅमिन डी हे पदार्थ आहारातून प्राप्त होत नसल्यास ते आपण औषधी स्वरूपात गोळ्यांच्या माध्यमाने किंवा इंजेक्शनच्या माध्यमाने वैद्यकीय सल्ल्यानुसार घेऊ शकतो. व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन बी १२ ची कमी शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे योग्य आहार आणि सूर्यप्रकाशाच्या संपर्कातून या दोन्हींचे प्रमाण राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. उपरोक्त पदार्थ आपल्या आहारामध्ये सध्याच्या स्थितीला कमी असतात त्यामुळे अधिकाधिक लोकांना व्हिटॅमिन बी १२, व्हिटॅमिन डीची कमतरता आढळून येत आहे.