शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
2
हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल
3
मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी
4
मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार
5
PM मोदी यांच्या हस्ते मेट्रो ३ मार्गिकेचे उद्घाटन; प्रवासात शाळकरी मुले, महिलांशी संवाद
6
दुर्गादेवी विरोधकांचा राजकीय संहार करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका
7
पंतप्रधानांचा ठाणे दौरा: तीन हजार अवजड वाहने रोखल्याने नाशिक-मुंबई प्रवास झाला सुसाट!
8
हरयाणामध्ये मतदारांनी कोणाला दिला सत्तेचा कौल? ६१ टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाची नोंद
9
‘वैद्यकीय शिक्षण’मध्ये कंत्राटी भरती करणार; आपलाच निर्णय सरकारकडून धाब्यावर
10
सरळसेवेची ‘ती’ पदे ‘मानधना’वर भरणार; सुट्टीच्या दिवशी राज्य सरकारचा जीआर
11
नायगाव बीडीडी आता ‘डॉ. आंबेडकर संकुल’; महायुती सरकारचा मोठा निर्णय
12
भोजनातून शासकीय वस्तीगृहातील ४० मुलींना विषबाधा; वैद्यकीय महाविद्यालयात उपचार
13
IND vs BAN: टीम इंडियाचा Shivam Dube टी२० मालिकेतून बाहेर; Mumbai Indians च्या फलंदाजाला मिळाली संधी
14
हरियाणात भाजपाची मतं वाढणार, पण जागा घटणार; असा आहे एक्झिट पोलमधील नंबर गेम
15
IND vs BAN 1st T20: "संजू सॅमसन सलामीला खेळेल, दुसरा ओपनर म्हणून..."; सूर्यकुमार यादवने दिली मोठी माहिती
16
Exit Poll: हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपासाठी एक्झिट कौल, कांग्रेस मारणार जोरदार मुसंडी 
17
हार्दिकला विसरून नताशाने शोधला नवा जोडीदार? स्वीमिंग पूलमध्ये केली मौजमजा 
18
'आप' मंत्र्याने विरोधी पक्षनेत्यांचे धरले पाय, दिल्लीत राजकीय नाट्य, फोटो व्हायरल
19
हिजबुल्लाहचा नवा प्रमुख सैफुद्दीन आठवडाभरही कमान सांभाळू शकला नाही, इस्रायलच्या हल्ल्यात ठार!
20
Exit Poll: काश्मीरमध्ये कोण बाजी मारणार? भाजपा की इंडिया आघाडी, समोर आली धक्कादायक आकडेवारी

Health tips: हदयाच्या विकारांवर रामबाण आहे 'या' झाडाची साल मात्र, अशाप्रकारे वापर केला तरच होईल फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2022 5:47 PM

अर्जुन वृक्षाची साल (Arjun Sal Benefit) अनेक आजार दूर करण्यासाठी उपयुक्त आहे. मात्र हृदयासंबंधित समस्या दूर करण्यासाठी अर्जुन साल खूपच फायदेशीर आहे.

आपल्याकडे आयुर्वेदाने सांगितलेल्या अनेक औषधी वनस्पती आणि वृक्षाची कमी नाही. बरेचसे शारीरिक आणि मानसिक त्रास आपण आयुर्वेदाच्या साहाय्याने घरच्या घरी कमी करू शकतो. अर्जुन साल (Arjun Bark Benefit) आयुर्वेदामध्ये औषधी म्हणून वापरली जाते. संपूर्ण अर्जुन वृक्ष (Arjun Tree) औषधी गुणांनी समृद्ध आहे. अर्जुन वृक्षाची साल (Arjun Sal Benefit) अनेक आजार दूर करण्यासाठी उपयुक्त आहे. मात्र हृदयासंबंधित समस्या दूर करण्यासाठी अर्जुन साल खूपच फायदेशीर आहे.

आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचा अवयव आपले हृदय म्हणजेच आपले हार्ट असते. हार्ट स्ट्रोक, हार्ट अटॅक आणि हार्ट फेल्युअर यावर अर्जुन वृक्षाच्या सालीचा उपयोग आणि त्याचे फायदे याबद्दल आतापर्यंत अनेक स्टडीज केल्या गेल्या आहेत. आज आम्ही तुम्हाला अर्जुन सालीचा उपयोग (Arjun Sal Use) कसा करावा याची माहिती देणार आहोत.

अर्जुन साल वापरण्याची पद्धत

  • जेवण करण्यापूर्वी अर्जुन सालचे पावडर (Arjun Sal Powder) पाण्यात टाकून दिवसातून एक किंवा दोनवेळा घ्यावे. 50 एमल एवढ्या प्रमाणात हे घ्यावे.
  • पाण्याऐवजी दुधात टाकूनही ही पावडर घेतली जाऊ शकते.
  • अर्जुन सालीपासून बनलेल्या कॅप्सुलदेखील (Arjun Sal Capsule) बाजारात उपलब्ध आहेत. यांचादेखील वापर तुम्ही करू शकता.
  • 2 कप पाण्यामध्ये 1 चमचा अर्जुन सालचे पावडर टाकून उकळून घ्या. पाणी उकळून अर्धे झाल्यावर गाळून कोमट झाल्यावर प्यावे.

हृदयासाठी फायदेशीरतुम्हाला हृदयाशी संबंधित आजार होत असतील तर अर्जुन सालीचे (Arjun Sal For Heart) सेवन करणे फायदेशीर ठरू शकते. अर्जुन साल हृदयाशी संबंधित सर्व प्रकारच्या आजारांवर फायदेशीर आहे. हृदयाचे ठोके अनियमित होत असतील तर अर्जुन सालचे सेवन केल्यास खूप फायदा होतो. तसेच हृदयातील जळजळ दूर करण्यात मदत होते. हृदयाला बळ देण्यासाठी अर्जुन साल उपयुक्त ठरते.

रक्तदाब नियंत्रणरक्तदाब नियंत्रित करण्यासाठी अर्जुनची साल इतर औषधी वनस्पतींसोबत वापरली जाते. कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर असलेल्या लोकांमध्ये डिस्पनिया आणि सिस्टोलिक ब्लड प्रेशर सुधारत असल्याचे दिसून आले आहे.

फुफ्फुसासाठी फायदेशीरअर्जुन साल आयुर्वेदानुसार खोकला, दमा आणि काही संक्रमणांसह फुफ्फुसाच्या विकारांवरदेखील मदत करू शकते.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स