सांधेदुखीमुळे फक्त भारतातीलच नव्हे, तर संपूर्ण जगभरातील लोक त्रस्त आहेत. जसंजसं या रोगाची लक्षणं वाढत जातात, तसतसं या रोगाने ग्रस्त असणाऱ्या लोकांना चालणं-फिरणंही नकोसं होतं. सांधेदुखीचा सर्वात जास्त परिणाम गडघे आणि मणक्यावर होतो. त्याचबरोबर हाताची बोटं, मनगट तसेच पाय यांसारख्या सांध्यांवरही याचा परिणाम दिसून येतो. भारतामध्ये प्रत्येक दुसरी किंवा तिसरी व्यक्ती गुडघेदुखीमुळे त्रस्त आहे.
तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की, देशामध्ये जवळपास 15 कोटींपेक्षा अधिक लोक गुडघेदुखीमुळे त्रस्त आहेत. ज्या वेगाने हा आजार वाढत आहे. त्यानुसार येणाऱ्या काही वर्षांमध्ये आर्थरायटिस लोकांना शारीरिकरित्या असक्षम बनवण्याचं कारण ठरू शकतं. भारतीय लोक आनुवांशिकरित्या गुडघ्यांच्या आर्थरायटिसने ग्रस्त आहेत. नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, चीनमध्ये जवळपास 6.5 कोटी लोक गुडघेदुखीने त्रस्त आहेत. यातुलनेत भारतामध्य गुडघेदुखीने त्रस्त असणाऱ्यांची संख्या अर्ध्यापेक्षाही कमी आहे. आज आम्ही तुम्हाला सांधेदुखीची समस्या टाळण्यासाठी कारणीभूत असलेल्या पदार्थांबाबत सांगणार आहोत. जेणेकरून असे पदार्थ आहारात वगळून तुम्ही आरोग्याची काळजी घेऊ शकता.
ग्लूटेन फूड
गव्हाचा समावेश अनेकांच्या आहारात असतो. गहू हे एक असे प्रोटीन असते. ज्यात वेगवेगळ्या प्रकारची पोषक तत्व असतात. याशिवाय गव्हात ग्लायडीन नावाचे एक प्रोटीनसुद्धा असते. यामुळे लोकांच्या शरीराला नुकसान पोहोचू शकतं. इन्फेमेशनची समस्या वाढते त्यासाठी डॉक्टर रहेयूमेटॉईड आर्थरायटीसपासून बचाव करण्यासाठी ग्लूटेन फ्री पदार्थांचा आहारात समावेश करायला हवा.
रेड मीट
काही अभ्यासातून असा दावा करण्यात आला आहे की रेड मीट इन्फेमेशनचं कारण ठरू शकतं. त्यामुळे आर्थरायटीसची लक्षणं अधित तीव्रतेनं जाणवू शकतात. २५ हजार ६३० लोकांवर करण्यात आलेल्या एका अभ्यासात दावा करण्यात आला होता की रेड मीटचे जास्त सेवन केल्यास आर्थरायटीसचा धोका वाढतो.
तुम्हाला माहीतही नसतील नारळ पाण्याचे हे ७ दुष्परिणाम; डॉक्टरांनी सांगितली सेवनाची योग्य वेळ
साखर
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार आर्थरायटीसच्या रुग्णांच्या शरीरात साखर योग्य प्रमाणात घ्यायला हवी. कँडी, सोडा, आईस्क्रीम किंवा सॉससारख्या पदार्थांमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. २१७ लोकांवर करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार साखरयुक्त पदार्थांमुळे आर्थरायटीसचा धोका वाढतो.
मीठ
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार आहारात मीठाचं जास्त प्रमाण गंभीर आजारांचे कारण ठरू शकते. म्हणून पॅक फूड, सूप, पीज्जा, प्रोसेस्ड मीट या पदार्थांचे सेवन योग्य प्रमाणात असायला हवं. उंदरावर ६५ दिवसांपर्यंत करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार संतुलित प्रमाणात मीठ घेतल्यानं आर्थरायटीसचा धोका कमी होतो.
कागदाच्या कपात चहा घेत असाल तर वेळीच व्हा सावध, रिसर्चमधून धक्कादायक खुलासा....
अल्कोहोल
इन्फ्लेमेटरी आर्थरायटीसचा सामना करत असलेल्या लोकांनी अल्कोहोलचे सेवन पूर्णपणे बंद करायला हवं. स्पॉडीलोआर्थरायटीसनं पीडित असलेल्या २७८ लोकांवर करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार इनफ्लेमेटरी आर्थरायटीस स्पायनल कॉर्ड आणि सॅकोयलियकवर वाईट परिणाम करतो. एल्कोहोलचे अतिसेवन स्पाईनल रचनेला बिघडवण्यासाठी कारणीभूत ठरू शकतं.