अलिकडे वेगवेगळ्या कारणांनी शुगर फ्री पदार्थांचं अधिक सेवन केलं जात आहे. अनेकजण साखरेऐवजी शुगर फ्री स्वीटर्सचा वापर करू लागले आहेत. डायबिटीस होऊ नये किंवा फॅट वाढू नये, अशी यामागची कारणे बघायला मिळतात. पण नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. या रिसर्चनुसार, आर्टिफिशिअल शुगरने टाइप-२ डायबिटीसचा धोका होऊ शकतो.
तज्ज्ञ सांगतात की, आर्टिफिशिअल स्वीटनर्सचे तत्व बॅक्टेरिया बदलून टाकतात, जे वेगाने वजन वाढण्याचे कारण टऱू शकतात आणि या स्थितीत टाइप-२ डायबिटीसचा धोका होऊ शकतो. शुगर ड्रिंक घेणाऱ्यांना सुरूवातीला वेट लॉस ड्रिंक्स घेऊन त्यांना चांगलं वाटू शकतं. पण याचा वापर जास्त काळासाठी केला गेला तर याचा परिणाम आनंददायी नक्कीच नसेल.
हा रिसर्च बोस्टन कॉलेजच्या वैज्ञानिकांनी केलाय. त्यांना रिसर्चमधून आढळून आलं की, साखरेऐवजी वापरल्या जाणाऱ्या पर्यायी स्वीटनर्सचा जास्त काळ वापर केला तर ब्लड वेसल्सवर वाईट प्रभाव पडतो. पुढे जाऊन ही स्थिती ब्रेन स्ट्रोक आणि डिमेंशियाचं देखील कारण होऊ शकते. आपल्या रिसर्चमध्ये टीमने आर्टिफिशिअल स्वीटनर्स सॅकेरिन, स्टीविओसाइड, सायक्लामेट, एस्पार्टेम, एसेसफ्लेम-के, सुक्रालोज, नीमोट आणि आउपरमेवर रिसर्च केलाय.
रिसर्चनुसार, गेल्या २० वर्षात तरूणांमध्ये आर्टिफिशिअल स्वीटनर्सचा वापर २०० टक्क्यांनी वाढला आहे. तेच ५४ टक्के वयस्क लोक याचा आपल्या डाएटमध्ये समावेश करतात. तज्ज्ञ मानतात की, अशाप्रकारे स्वीटनर्सचा वापर करण्याऐवजी चांगला आहार घ्यावा, ज्यात प्लांट डाएट, कडधान्य, डेअरी प्रॉडक्ट्स, सी-फूड यांचा समावेश असावा.