kidney stone : गोखरू ही एक आयुर्वेदिक औषधी आहे जी ट्रिबुलस टेरेस्ट्रिस नावाने ओळखली जाते. याला काटे गोखरू किंवा सराटा असंही म्हणतात. ही एक छोटी आयुर्वेदिक जडीबुटी आहे. याचा वापर खासकरून मूत्ररोग, पॉलिसिस्टीक ओवरी सिंड्रोम, प्रोस्टेट ग्रंथीची समस्या, हृदयरोग आणि किडनीच्या समस्या दूर करण्यासाठी केला जातो.
गोखरू मसल्स वाढवणे, मेमरी शार्प करणे, पुरूष व महिला दोघांचीही कामेच्छा वाढवणे यातही फायदेशीर मानलं जातं. जास्तीत जास्त आयुर्वेदिक एक्सपर्ट गोखरूचा वापर किडनी स्टोन बरा करण्यासाठी करतात. प्रसिद्ध आयुर्वेदिक एक्सपर्ट डॉक्टर ऐश्वर्या संतोष यांनी गोखरूचं हर्बल पाणी तयार करण्याची पद्धत सांगितली आहे. जे किडनी स्टोनमध्ये फार फायदेशीर आहे.
डॉक्टर ऐश्वर्या संतोष यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टवर सांगितलं की, गोखरू यूरिनरी कॅलकुलीमध्ये फायदेशीर ठरतं. यात लिथोट्रिप्टिक अॅक्टिविटी असते. या अॅक्टिविटीमध्ये स्टोन तोडण्याची क्षमता असते. संतोष यांनी याचा वापर करण्याची पद्धत सांगितली आहे. त्यांनी लिहिलं की, '2 चमचे गोखरूचं पावडर उकडून घ्या किंवा गोखरूचं फळ सुकवून बारीक करा. हे दोन लीटर पाण्यात उकडून घ्या. नंतर हे पाणी गाळून रोज थोडं थोडं सेवन करा'.
किडनी स्टोन कसा दूर करतं गोखरू
गोखरूचं चुर्ण शरीरातील अतिरिक्त अॅसिड कमी करतं. तसेच किडनीमध्ये यूरिक अॅसिडचं प्रमाण कमी ठेवण्यासही याने मदत होते. याने किडनीचं आरोग्य चांगलं राहतं. गोखरूच्या चुर्णात अॅंटी-लिथियासिस गुण असतात. ज्याने किडनीमध्ये स्टोनचा विकास होत नाही. तसेच ज्यांना आधीच स्टोन आहे ते तोडण्याचं कामही याने होतं. अशाप्रकारे हे चुर्ण पॉलिसिस्टीक किडनी रोग, किडनी स्टोन आणि सिस्टिटिसला रोखतं. त्यासोबतच याने डायबिटीसही नियंत्रित राहतो.