एका आईसाठी तिचं मुलं म्हणजे, तिंच जीवन असतं, असं म्हणणंही वावग ठरणार नाही. तिच्या लाडक्या बाळाला साधा ताप जरी आला तरि ती त्याच्या उशाशी बसून रात्र जागून काढते. मग विचार करा की, जर तिचं बाळ जर मृत्यूशी झुंज देऊन पुन्हा तिच्याकडे परतलं तर तिच्याकडे परतलं तर त्या आईसाठी त्याहून आनंदाचा क्षण दुसरा काही असेल का?
असचं काहीसं चीनमध्ये राहणाऱ्या एका आईबाबत झालं आहे. या आईचा आणि तिच्या बाळाचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. कारण त्या आईचं अवघ्या 66 दिवसांचं बाळ मृत्यूच्या दारातून परतलं आहे.
66 दिवसांच्या रुईरुईची हार्ट ट्रान्सप्लांट सर्जरी करण्यात आली असून ती पूर्णपणे यशस्वी झाली आहे. त्यानंतर रुईरुईच्या आईने तिला जवळ घेतलं आणि त्यावेळी टिपण्यात आलेला या दोघी मायलेकींचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
तीन महिन्यांसाठी ठेवण्यात येणार आयसीयूमध्ये
चीनमधील वुहान शहरातील यूनियन हॉस्पिटमध्ये 66 दिवसांच्या आणि अवघं तीन किलो वजन असणाऱ्या रुईरुईचं हार्ट ट्रान्सप्लांट करण्यात आलं. संपूर्ण आशिया खंडातील ही एकमेव अशी केस असून ज्यामध्ये एका लहान बाळाचं हृदय बदललं आहे.
सर्जिकल टीमचं नेतृत्त्व करणाऱ्या डॉक्टर डोंग नियांगुओ यांनी सांगितले की, रुईरुईला एका चार वर्षांच्या बाळाचं हृदय ट्रान्सप्लांट करण्यात आलं. या मुलाचं नाव टोंगटोंग असं आहे. तसेच डॉक्टरांनी सांगितले की, ऑपरेशन दरम्यान अनेक समस्यांचा सामना करावा लागला. पण ऑपरेशन यशस्वी करण्यात डॉक्टरांना यश मिळालं. ऑपरेशन झाल्यानंतर रुईरुईला कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन झालेलं नाही. तसेच तिला तीन महिने आयसीयूमध्ये ठेवण्यात येणार आहे.
2014 मध्ये 113 दिवसांच्या बाळाचं करण्यात आलं होतं हार्ट ट्रांसप्लांट
याआधी 2014मध्ये चीनच्या वुहानमध्ये 113 दिवसांच्या बाळाचं हार्ट ट्रांसप्लांट करण्यात आलं होतं. या बाळाचं वजन 4.25 किलो होतं. रुईरुईच्या कुटुंबियांनी आधी ऑपरेशन झालेल्या बाळाच्या कुटुंबियांशी चर्चा केली आणि त्यानंतर रुईरुईच्या ऑपरेशनसाठी परवानगी दिली.
लहान मुलांचे अवयव दान करणारे सहजासहजी मिळत नाहीत...
फक्त भारतच नाहीतर जगभरामध्ये अनेक असे देश आहेत, जिथे अवयव दान करणाऱ्या व्यक्ती सहजासहजी मिळत नाहीत. रुईरुईला गुआंगडोंग प्रांतातील ग्वांघजूमध्ये राहणाऱ्या टोंगटोंग यांचं हृदय ट्रान्सप्लांट करण्यात आलं आहे. टोंगटोंगचा मृत्यू एका इमारतीतून पडल्यामुळे झाला होता. त्यानंतर या मुलाच्या आईवडिलांना अवयदानाबाबत सांगण्यात आलं.
अवयव दान केल्याने एखाद्या व्यक्तीला जीवदान मिळतं. यामध्ये कोणतीही वाईट गोष्ट नाही. तसेच समाज कल्याणासाठी उचललेलं पाऊलचं आहे. असं म्हणणंही वावगं ठरणार नाही.