शतावरी आहे गुणकारी !
By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2017 4:28 PM
आयुर्वेदात शतावरी वनस्पतीचे महत्त्व खूपच आहे. स्त्रियांशी निगडीत आजार दूर करण्याबरोबरच शतावरीचे अनेक उपयोग आहेत. आज आपण शतावरीचे नेमके कोणते आश्चर्यकारक फायदे आहेत याबाबत जाणून घेऊया.
-रवींद्र मोरे आयुर्वेदात शतावरी वनस्पतीचे महत्त्व खूपच आहे. स्त्रियांशी निगडीत आजार दूर करण्याबरोबरच शतावरीचे अनेक उपयोग आहेत. आज आपण शतावरीचे नेमके कोणते आश्चर्यकारक फायदे आहेत याबाबत जाणून घेऊया. * शतावरीत असलेल्या फायको-इस्ट्रोजन हार्मोन प्रिकर्सरमुळे स्त्रियांमध्ये गर्भधारण क्षमता व ऊर्जा वाढवण्यासाठी मदत होते. यामुळेच या वनस्पतीला शंभर पुरुषांना वर बनवण्याची शक्ती आहे अशी म्हणजेच शतावरी हे नाव देण्यात आले आहे. * शतावरी एक उत्तम औषध असून, स्त्रियांच्या प्रजनन संबंधित अवयवांसाठीही खूप उपयुक्त आहे. * बहुतांश महिलांना मासिक पाळी येण्यापूर्वी खूप त्रास होतो. पाळीदरम्यान पोट दुखणे, पाठ दुखणे किंवा डोकेदुखीसारख्या समस्या उद्भवत असतील तर शतावरी घेतल्यास नक्कीच लाभदायक ठरेल. * स्मरणशक्ती कमी होणे तसेच रजोनिवृत्तीच्या काळात जळजळ होणे आदी समस्यांवर उपाय म्हणून शतावरी वापरता येते.* बहुतेक पुरुषांना यौन समस्या आढळून येतात. या समस्या निवारणासाठीही शतावरी हे उत्तम औषध असल्याचे दिसून आले आहे. * बाळंतीण स्त्रियांना दुधाचे प्रमाण व गुणवत्ता वाढवण्यासाठी शतावरी उपयोगी आहे. * शतावरीमुळे वाढत्या वयात येणारा थकवा तसेच कोरडेपणा दूर होण्यास मदत होते. * शतावरीत अँटी बॅक्टेरिया, अँटी कॅन्सर व अँटी अल्सर गुण असल्याने पचनशक्ती सुधारुन पोटाचे कार्य सुरळीत ठेवण्यास मदत करतात. * शतावरीमुळे आॅक्सिडंट, बॅक्टेरिया, बुरशी यामुळे होणाºया रोगांपासून बचाव होण्यास मदत होते. * शिवाय मनावरील ताणतणाव कमी होऊन मन शांत ठेवण्यासाठीही शतावरी उपयोगी आहे.