अस्थमा फुफ्फसांशी निगडीत असणारा एक आजार आहे. अस्थमाच्या रूग्णांना श्वास घेण्यासाठी त्रास होत असतो. त्याचं कारण म्हणजे, अस्थमा झालेल्या व्यक्तींना श्वास नलिकेला सूज येते आणि श्वसननलिका छोटी होते. अस्थमाचे दोन प्रकारांमध्ये वर्गीकरण करण्यात येते. एक म्हणजे, अटॉपिक आणि दुसरा प्रकार गैर-अटॉपिक असे दोन प्रकार आढळून येतात. अटॉपिक अस्थमा हा वातावरणातील धूळ. माती, प्रदूषण यांसारख्या कारणांमुळे होतो. तर गैर-अटॉपिक अस्थमा श्वसनावाटे रासायनिक तत्वांचा शरीरामध्ये समावेश झाल्याने होतो. अस्थमावर जर योग्यवेळी उपचार केले नाही तर ते आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. अस्थमाच्या आजारावर लो-सोडियम डाएट अत्यंत परिणामकारक ठरतं.
असे करा उपचार
अस्थमाच्या आजारामध्ये लो-सोडियम डाएट अत्यंत फायदेशीर ठरतं. अस्थमाच्या त्रासाचा सामना करावा लागत असेल तर त्यावर उपाय म्हणून सैंधव मीठ खाल्याने आराम मिळतो. त्याचबरोबर मीठाच्या पाण्याने गुळण्या केल्याने सूज, वेदना, कोरडा खोकला यांपासून सुटका होत. याव्यतिरिक्त फ्रेश आणि फ्रोजन भाज्या कोणत्याही सॉसशिवाय खाल्याने फायदा होतो. तसेच ड्रायफ्रुट्सही अस्थमावर परिणामकारक ठरतात.
अस्थमामुळे दीर्घकाळ त्रास सहन करावा लागतो. तसेच सातत्याने वैद्यकिय तपासणीची आवश्यकता असते. साधा ते तीव्र अस्थमा असलेल्या व्यक्तींनी दिर्घकाळ आणि दैनंदिन औषधं घेतल्याने दम्याच्या त्रासातून सुटका होऊ शकते.
लक्षणं :
- कफ किंवा कोरडा खोकला येणं- छातीमध्ये दुखणं आणि अस्वस्थ वाटणं. - व्यायाम करताना सतत दम लागणं आणि अस्वस्थ वाटणं- जोरात श्वास घेतल्याने थकवा येणं- श्वास घेण्यास त्रास होणं- थंड हवेमध्ये श्वास घेण्यास त्रास होणं
कारणं :
- कारखने, वाहनांमधून येणारा धूर - सर्दी, ताप, धुम्रपान, वातावरात होणारे बदल- अॅलर्जी असणारे पदार्थ - पोटात अॅसिडचे प्रमाण वाढणं. - औषधं आणि मद्यपान यांच्या अतिसेवनाने- आनुवांशिक कारणामुळे
टिप : वरील सर्व गोष्टी केवळ माहिती म्हणून आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगळी असते त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक असतं.