कोरोनाच्या विरोधातल्या लढाईत मोठं अपयश आलं असून, लढ्याला मोठा धक्का बसला आहे. अॅस्ट्रॅजेनेका(AstraZeneca) आणि ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी लस(Oxford covid-19 Vaccine)च्या मानवी चाचणीत सामील असलेली व्यक्ती आजारी पडल्यानंतर त्याचा प्रयोग थांबवण्यात आला आहे. अॅस्ट्रॅजेनेका यांनी एक निवेदन जारी केले आहे की, चाचणीत एक नियमित व्यत्यय आलं आहे, कारण चाचणीत सामील झालेल्या व्यक्तीच्या आजाराबद्दल अद्याप काहीही समजू शकलेले नाही.या लसीला AZD 1222 असे नाव देण्यात आले. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन(WHO)च्या मते, जगातील इतर लसींच्या चाचण्यांच्या तुलनेत हे आघाडीवर होते. ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या लसीकडे भारतासह अनेक देशांचे लक्ष लागून आहे. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी मार्केटमध्ये पहिले स्थान मिळवेल, अशी आशा आहे. तसेच तज्ज्ञांचेही मत आहे.AFPच्या वृत्तानुसार सध्या सुरू असलेले ट्रायल जगभर थांबविण्यात आले आहे आणि आता स्वतंत्र तपासणीनंतरच ते पुन्हा सुरू होऊ शकते. लस चाचणीच्या तिस-या टप्प्यात हजारो लोक सामील आहेत आणि बर्याचदा यासाठी अनेक वर्षे लागतात. कोरोना लसीच्या तिसर्या टप्प्यातील चाचणीमध्ये जवळजवळ 30,000 लोकांचा समावेश आहे. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या प्रवक्त्याने सांगितले की, "मोठ्या चाचणीत आजारी पडण्याची सर्व शक्यता आहे, परंतु काळजीपूर्वक तपासणी करण्यासाठी स्वतंत्र तपासणी करणे फार महत्त्वाचे आहे." ऑक्सफोर्ड विद्यापीठात कोरोना व्हायरस लसीची चाचणी थांबविण्याची ही दुसरी वेळ आहे.
मोठा धक्का! एक व्यक्ती आजारी पडल्यानंतर ऑक्सफोर्डनं कोरोनावरच्या लसीची चाचणी थांबवली
By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2020 8:34 AM