लंडन : कर्करोगाचे काही प्रकार असे आहेत की, त्यांची कोणतीही लक्षणे आढळून येत नाहीत. अशा बिगरलक्षण कर्करोगाचे आता रक्ताच्या चाचणीद्वारे निदान करणे शक्य होणार आहे. त्या चाचणीला गॅलरी टेस्ट असे नाव देण्यात आले आहे. यासंदर्भात आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या संशोधनासाठी ५० वर्षे वयावरील सहा हजार जणांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
जगभरातील नवे संशोधन, तंत्रज्ञान यांच्याबाबत पाथफाईंडर ही कंपनी अद्ययावत माहिती देत असते. पाथफाईंडरने म्हटले आहे की, बिगरलक्षण कर्करोगाचे निदान करण्यासाठी रक्त चाचणी किती उपयोगी आहे याची सहा हजार जणांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यातील काही जणांच्या कर्करोगाचे निदान रक्त चाचणीद्वारे करण्यात आले. त्या व्यक्तींना कर्करोग झाल्याची कोणतीही लक्षणे नव्हती.
रक्त चाचणीद्वारे बिगरलक्षण कर्करोगाचे निदान होते हे लक्षात आल्यानंतर ब्रिटनने एक घोषणा केली आहे. पुढील वर्षी १.६ लाख नागरिकांची अशी रक्तचाचणी करण्याचे ब्रिटनने ठरविले आहे. या चाचणीमुळे रोगाचे निदान त्वरित होऊन उपचारांचा वेगही वाढविता येईल असे ब्रिटनने म्हटले आहे.
एका महिलेला दोन प्रकारचे कर्करोगकाही रुग्णांमध्ये ट्यूमर आढळले. त्यापैकी १४ रुग्णांच्या शरीरातील प्राथमिक अवस्थेत होते. त्यातील एका महिलेला दोन प्रकारचे कर्करोग झाल्याचे निदर्शनास आले. या सर्व रुग्णांनी पुढील काळात नियमित वैद्यकीय तपासणी करून घ्यावी, असा सल्ला डॉक्टरांनी त्यांना दिला. ही माहिती बिगरलक्षण कर्करोगाचे निदान रक्त चाचणीव्दारे करण्याच्या संशोधन पथकातील एक शास्त्रज्ञ फॅब्रिस आंद्रे यांनी दिली.