शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
2
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
3
HDFC Life Insurance Data Leak : 'या' दिग्गज लाइफ इन्शुरन्स कंपनीचा डेटा लीक; तुम्ही तर नाही आहात ना पॉलिसी होल्डर?
4
Chinmoy Krishna Das: बांगलादेशात चिन्मय कृष्णा दास यांना अटक, प्रकरण काय?
5
धक्कादायक! नर्स बनून आल्या अन् ब्लड टेस्टच्या बहाण्याने चोरलं बाळ; घटना सीसीटीव्हीत कैद
6
घडामोडींना वेग; एकनाथ शिंदेंच्या आजी-माजी खासदारांनी मोदींकडे मागितली भेटीची वेळ 
7
"बंदुका हिसकवा, पोलिसांना पळून जावू देवू नका’’, जमावातून दिली जात होती चिथावणी, संभल हिंसाचाराबाबतच्या FIRमधून धक्कादायक माहिती समोर   
8
पारंपरिक पद्धतीने होणार नागा चैतन्य-शोभिताचा लग्नसोहळा, तब्बल ८ तास चालणार सर्व विधी
9
बकिंगहॅम पॅलेसपेक्षाही मोठा महाल; जगातील सर्वात मोठं खासगी निवासस्थान, कोण आहेत राधिकाराजे गायकवाड?
10
मराठी येत नाही, माफी मागणार नाही, हिंदीत बोला; रेल्वे कर्मचाऱ्याने घातला वाद
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्री निवासस्थावरील एकनाथ शिंदेंच्या नावाची पाटी आधी काढली, पुन्हा लावली; चर्चांना उधाण
12
अनुषाने 'लव्ह यू' म्हणत भूषणच्या वाढदिवसानिमित्त केली पोस्ट; चाहते म्हणाले, "आता लग्नच करा..."
13
Maharashtra Assembly Election Result 2024: मुख्यमंत्रिपद टिकवण्यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्नशील; भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांसाठी आग्रही
14
तुमचं Pan Card निरुपयोगी होणार का? QR कोडसह नवीन कार्ड कसं मिळवायचं, जाणून घ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं
15
IPL 2025 : कोणत्या खेळाडूला किती भाव मिळाला? सर्व १० संघांची संपूर्ण यादी एका क्लिकवर
16
नागा चैतन्यशी घटस्फोटावर समांथाने ३ वर्षांनी सोडलं मौन, म्हणाली- "माझ्याबद्दल खोट्या गोष्टी सांगितल्या गेल्या..."
17
Essar समूहाचे सह-संस्थापक शशी रुईया यांचं निधन; ८० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
18
चंदिगडमध्ये रॅपर बादशाहच्या नाईट क्लबमध्ये स्फोट; खंडणीच्या उद्देशाने स्फोट, पोलिसांचा दावा
19
अरेरे! १.२५ लाख पगार, नवरदेवाने दाखवली सॅलरी स्लीप पण ऐनवेळी नवरीने दिला नकार, कारण...
20
Maharashtra Election: 'या' १२ मतदारसंघात बसपा, वंचित व मनसेपेक्षा अपक्ष उमेदवार ठरले भारी!

ओव्हरवेट लोकांचं आयुष्य बदलू शकते अ‍ॅव्होकॅडो डाएट, पटापट करा वजन कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2019 11:06 AM

जगभरात वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या डाएट फॉलो केल्या जातात. जसे की, प्रोटीन डाएट, लो कार्ब डाएट आणि ग्लूटेन डाएट इत्यादी.

जगभरात वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या डाएट फॉलो केल्या जातात. जसे की, प्रोटीन डाएट, लो कार्ब डाएट आणि ग्लूटेन डाएट इत्यादी. पण गेल्या काही वर्षात आणखी एक डाएट चांगलीच लोकप्रिय ठरत आहे. ती म्हणजे कीटो डाएट. आलिया भट, हुमा कुरेशी, सोनम कपूर आणि झरीन खान ही डाएट फॉलो करतात. कीटो डाएटला केटोजेनिक डाएट असंही म्हटलं जातं.

असे सांगितले जाते की, ही डाएट फॉलो करणे फार कठीण असतं. पण जे लोक ओव्हरवेट आहेत, त्यांच्यासाठी ही डाएट कोणत्याही औषधीपेक्षा कमी नाही. कीटो डाएटमध्ये अशा भाज्या किंवा पदार्थ खाल्ले जातात, ज्यांमध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण कमी असतं. मात्र पोषक तत्त्वांचं प्रमाण अधिक असतं.

(Image Credit : Daily Star)

या डाएटमध्ये तसे तर फ्लॉवर, कोबी, दही, बटर, नट्स, सीफूड, मांस आणि अंडी यासारख्या गोष्टी खाल्ल्या जातात. पण अ‍ॅव्होकॅडो डाएट वजन कमी करण्यात या गोष्टींपेक्षा अधिक फायदेशीर ठरते.

वजन कमी करण्यात अ‍ॅव्होकॅडोचे फायदे  

(Image Credit : Daily Express)

- अ‍ॅव्होकॅडोमध्ये फॅटचं अधिक प्रमाण असतं. तरी सुद्धा हे फळ वजन कमी करण्यात एकदम परफेक्ट आहे. याचं कारण अ‍ॅव्होकॅडोमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं. जे पचनाला फार जास्त वेळ घेतो. यामुळे पोट भरलेलं राहतं आणि लवकर भूक लागत नाही. आणि जेव्हा भूक लागत नाही तेव्हा तुम्ही कमी खाता.

(Image Credit : Wellness Outpost)

- त्यासोबतच अ‍ॅव्होकॅडोमध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाणही कमी असतं. अ‍ॅव्होकॅडोमध्ये काही असे तत्त्व असतात जे केवळ शरीरातील विषारी तत्व बाहेर काढण्यासच मदत करत नाही तर कोलेस्ट्रॉलचं प्रमाणही कमी करतात आणि पचनक्रियाही सुधारतात.

- अ‍ॅव्होकॅडोमध्ये ओलिक अ‍ॅसिड (oleic acid) नावाचा अनसॅच्युरेडेट फॅट असतो. हे फॅट वजन कमी करण्यास फायदेशीर आहे. कारण हा एक हेल्दी फॅट आहे आणि या फॅटमुळे पोट जास्त वेळासाठी भरलेलं राहतं. त्यामुळे भूक लवकर लागत नाही.

अ‍ॅव्होकॅडो खाण्याची पद्धत

(Image Credit : Oxford Online Pharmacy)

तुम्ही जर वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर अ‍ॅव्होकॅडो हे फळ तुम्ही आहारात सामिल करा. हे फळ तुम्ही सलाद म्हणून खाऊ शकता. तसेच याचा ज्यूसही तुम्ही सेवन करू शकता. अ‍ॅव्होकॅडोचा ज्यूस तयार करण्यासाठी अ‍ॅव्होकॅडोमध्ये एक ऑरेंज ज्यूस मिळवा आणि थोडं मीठ घाला. त्यासोबतच तुम्ही अ‍ॅव्होकॅडोची भाजी करूनही खाऊ शकता.

(टिप : काही लोकांना अ‍ॅव्होकॅडोची अ‍ॅलर्जी असू शकते. त्यामुळे हे फळ खाण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला आवर्जून घ्यावा.)

टॅग्स :Weight Loss Tipsवेट लॉस टिप्सFitness Tipsफिटनेस टिप्स