काही असे पदार्थ असे असतात ज्यांचं सेवन त्या त्या वेळेवरच केलं पाहिजे. म्हणजे काही पदार्थ सकाळी खाणं चांगलं असतं तर काही पदार्थ रात्री. पण रात्री कोणत्या भाज्यांचं सेवन करावं किंवा करू नये असा प्रश्न अनेकदा लोकांना पडत असतो. अशात आज आम्ही तुम्हाला रात्री कोणत्या भाज्यांचं सेवन करू नये याबाबत सांगणार आहोत. रात्री जर या भाज्याचं सेवन केलं तर पचनक्रियेवर नकारात्मक प्रभाव पडतो. या भाज्यांमुळे रात्री गॅस, अॅसिडिटी आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्या होऊ शकतात.
रात्री होणाऱ्या पचनासंबंधी समस्यांमुळे तुमची झोपही खराब होऊ सकते. जर झोप पूर्ण झाली नाही तर इतरही समस्या होऊ शकतात. अशात आज आम्ही तुम्हाला ५ भाज्यांबाबत सांगणार आहोत ज्यांचं सेवन तुम्ही टाळलं. पाहिजे.
वांगी
वांग्यांमध्ये सोलेनिन नावाचं तत्व असतं जे पचनासंबंधी समस्याचं कारण बनू शकतं. वांग्यांचं सेवन केल्याने पोट जड वाटू लागतं. त्यामुळे रात्री वांग्याच्या भाजीचं सेवन करणं टाळलं पाहिजे.
टोमॅटो
टोमॅटोमुळे तुम्हाला अॅसिडिटीची समस्या होऊ शकते. कारण यात अॅसिडिक तत्व असतात. रात्री टोमॅटो खाल्ल्याने असिड रिफ्लक्स किंवा हार्टबर्नची समस्या होऊ शकते. ज्यामुळे तुमची झोपही खराब होते.
शिमला मिरची
शिमला मिरचीमध्ये असलेलं कॅप्सायनिक तत्व शरीरात उष्णता वाढतं आणि याच्या अधिक सेवनामुळे पोटात जास्त उष्णता होते. याची भाजी रात्री खाल्ल्याने पोटात जळजळ आणि पचनासंबंधी समस्या होऊ शकते. त्यामुळे रात्री याचं सेवन करणं टाळलं पाहिजे.
फ्लॉवर
फ्लॉवर भाजी रात्री खाल्ल्याने तुम्हाला गॅससंबंधी समस्या होऊ शकते. याने गॅस आणि अॅसिडिटीची समस्या होते. त्यामुळे तुमची झोपही खराब होते.
भेंडी
भेंडीमध्ये फायबर भरपूर असतं. यात असेही काही तत्व असतात जे पचनक्रिया हळुवार करतात. त्यामुळे ही भाजी रात्री खाल तर पचनासंबधी समस्या होते आणि झोपही खराब होते.