हाय ब्लड शुगरसाठी आवळा फार चांगला उपाय मानला जातो. तसं आवळ्याला प्राचीन काळापासून आयुर्वेदात औषधी म्हणून फार महत्वाचं स्थान आहे. आरोग्यासाठी वेगवेगळ्या दृष्टीने आवळा महत्वाचा ठरतो. डायबिटीसच्या रूग्णांसाठी आवळा एक चांगला पर्याय आहे. त्यामुळेच डाएट एक्सपर्ट हाय ब्लड शुगर कंट्रोल करण्यासाठी आवळ्याचा ज्यूस सेवन करण्याचा सल्ला देतात. केवळ डायबिटीसच नाही तर इतरही अनेक समस्यांपासून आवळा तुमचा बचाव करतो.
मॉर्निंग सिकनेस
(Image Credit : mims.co.uk)
प्रेग्नन्सीदरम्यान सकाळी झोपेतून उठल्यावर महिलांना फार त्रास होतो. याला मॉर्निंग सिकनेस म्हणतात. यापासून सुटका मिळवण्यासाठी आवळ्याचं सेवन करू शकता. सकाळी जर चक्कर किंवा उलटीसारखं वाटत असेल तर आवळ्याचा एक कच्चा तुकडा किंवा सुकलेला आवळा चघळा.
पचनक्रिया
(Image Credit : funkidslive.com)
पचनक्रिया सुधारण्यासाठी आवळा एक नैसर्गिक उपाय मानला जातो. अनेकजण जेवण केल्यावर आवळा खातात. तुम्हाला जर अपचनाची समस्या असेल तर आवळ्याचे २ ते ३ तुकडे खावेत. हा पचनासाठी घेतल्या जाणाऱ्या औषधांपेक्षा चांगला उपाय आहे. आवळा पचनक्रियेसाठी आवश्यक गॅस्ट्रिक लिक्विड निर्माण करण्यास मदत करतो.
तोंडाची दुर्गंधी
ज्या लोकांना नेहमी तोंडाची दुर्गंधी येण्याची समस्या असते, त्यांनी नेहमी आवळा खावा. सुकलेला आवळा नेहमी सोबत ठेवावा. जेव्हाही तोडांची दुर्गंधी येत असेल तेव्हा आवळ्याचे २ तुकडे चघळावे. यातील अॅंटी-इफ्लेमेटरी तत्व तोंडाच्या दुर्गंधीसाठी जबाबदार बॅक्टेरिया नष्ट करतात.
'सी' व्हिटॅमिनने परिपूर्ण
संशोधनातून सिद्ध झाल्यानुसार, आवळ्यामध्ये जितकं व्हिटॅमिन सी आढळतं तितकं इतर कोणत्याही फळामध्ये आढळत नाही. व्हिटॅमिन सी हे केस आणि त्वचेचं आरोग्या राखण्यास अत्यंत उपयुक्त असतं. त्यामुळे आवळ्याच्या सेवनानं त्वचा आणि केसांना फायदा होतो. अशा बहुगुणी आवळ्याच्या सेवनानं तारूण्य टिकवून ठेवण्यास मदत होते.