शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
3
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
4
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
5
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
6
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
7
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
8
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
9
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
10
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
11
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
12
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
13
'पंचायत'च्या मेकर्सने केली नव्या सिनेमाची घोषणा, सिद्धार्थ मल्होत्रा प्रमुख भूमिकेत! 'या' दिवशी होणार प्रदर्शित
14
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
15
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
16
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
17
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा
18
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
19
Tax Savings in FY25: पोस्ट ऑफिसची 'ही' जबरदस्त स्कीम वाचवते तुमचा मोठा टॅक्स; कमाईचीही गॅरेंटी, पाहा डिटेल्स

मूळव्याधामुळे उठणं-बसणं अवघड झालंय? आयुर्वेद डॉक्टरांनी सांगितला एक खास उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2024 12:59 PM

Piles : ही समस्या कधी कधी इतकी वाढते की, सर्जरी करण्याची वेळ येते. अशात आज आम्ही तुम्हाला मूळव्याध दूर करण्याचा एक आयुर्वेदिक उपाय सांगणार आहोत. 

Piles : पाइल्स म्हणजे मूळव्याधची समस्या आजकाल जास्तीत जास्त लोकांना होत आहे. मूळव्याधची समस्या इतकी गंभीर असते की, व्यक्तीचं उठणं, बसणं आणि झोपणंही अवघड होतं. मूळव्याध झाल्यावर गुदद्वारात इतक्या वेदना होतात की सहन होत नाहीत. पण ही समस्या होण्याला आपणंच कारणीभूत असतो. आपल्याच काही चुकांमुळे ही समस्या होते. ही समस्या कधी कधी इतकी वाढते की, सर्जरी करण्याची वेळ येते. अशात आज आम्ही तुम्हाला मूळव्याध दूर करण्याचा एक आयुर्वेदिक उपाय सांगणार आहोत. 

आयुर्वेद डॉक्टर विलास शिंदे यांनी इन्स्टावर एक व्हिडीओ शेअर करून मूळव्याध दूर करण्याचा, कोंब गाळून पाडण्याचा एक सोपा आणि आयुर्वेदिक उपाय सांगितला आहे. हा उपाय तुम्ही घरीच सहजपणे करू शकता.

डॉ. विलास शिंदे यांनी सांगितलं की, "कडूलिंबाचं फळ म्हणजे लिंबोळ्या मूळव्याध दूर करण्यासाठी फार फायदेशीर असतात. लिंबोळ्याचा एक खास मलम तयार करून लावला तर मूळव्याधामुळे आलेला कोंबही गळून पडतो आणि मूळव्याध बरा होतो. यासाठी मूठभर लिंबोळ्या घ्याच्या आणि त्यातील गर काढायचा. हा गर खोबऱ्याच्या तेलात टाकून गॅसवर चांगला परतवून घ्या. तो लालसर झाला असेल त्यानंतर मलम गाळून घ्या. काही दिवस सकाळी संध्याकाळ हा मलम लावा. याने मूळव्याधाचा कोंब गळून पडेल आणि तुम्हाला आराम मिळेल".

काय आहे मुळव्याध?

मुळव्याध हा एक असा आजार आहे ज्यात मलाशय मार्गात आतून आणि बाहेरून सूज येते. यामुळे बाहेरच्या आणि आतील बाजूस काही मांस जमा होतं. यातून रक्तही येतं आणि वेदनाही भरपूर होते. 

पाइल्स होण्याची कारणं

पाइल्स वाढण्याचं कारण बदलती लाइफस्टाईल आणि खाण्या-पिण्यात झालेले बदल हे आहेत. आजकाल फळं खाण्याऐवजी त्यांचा ज्यूस घेतला जातो. यात फायबर नसतं. पण आपल्या मोठ्या आतडीमध्ये केवळ फायबर आणि पाणी जातं. फास्ट फूडच्या चलनामुळे आणि फिजिकल अॅक्टिविटी कमी झाल्याने लोक पाणीही कमी पितात. यामुळे लोक पाइल्सचे शिकार होतात.

- बद्धकोष्ठता

- जास्त तिखट, तेलकट तसंच बाहेरचे पदार्थ जास्त खाणे

- जास्त मांसाहार, मद्यसेवन, सिगारेट, तंबाखू सेवन

- एका जागी बसून तासंतास काम करणे

- सतत जास्त जागरण करणे

- जेवणाच्या आणि कामाच्या अनियमित वेळा

- कोरडे आणि शिळे अन्न खाणे

- अनुवांशिक

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य