आजकालच्या धावपळीच्या जीवनात लोकांची लाइफस्टाईल खूपच बदलली आहे. खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे लोकांना आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे होणाऱ्या मुख्य समस्यांपैकी एक म्हणजे मुतखडा आणि मुळव्याध. या दोन्ही समस्या फार जास्त वेदना देणाऱ्या असतात. लोकांचं उठणं-बसणं या समस्यांमुळे मुश्किल होऊन जातं. अशात ज्या लोकांना या समस्या असतील त्यांच्यासाठी आम्ही एक खास आयुर्वेदिक उपाय घेऊन आलो आहोत.
आयुर्वेदाचा वापर करून अनेक समस्या दूर करण्याची परंपरा खूप आधीपासून चालत आली आहे. अनेक गंभीर समस्यांचे उपाय आयुर्वेदात सांगितलेले आहेत. असाच एक उपाय आज आम्ही सांगणार आहोत. ज्याचा वापर केल्यास तुमचा मुतखडा बाहेर पडेल आणि मुळव्याधाची समस्याही लगेच दूर होईल. आयुर्वेद डॉक्टर विलास शिंदे यांनी एक व्हिडीओ पोस्ट करून एका भाजीबाबत सांगितलं आहे. या भाजीचं काही दिवस सेवन केल्याने मुतखडा आणि मुळव्याध दूर होईल. सोबतच शरीराला इतर फायदेही मिळतील.
शक्तीशाली भाजी
आयुर्वेद डॉक्टर विलास शिंदे यांनी सांगितलं की, "तांदळज्याची भाजी खाऊन तुम्ही या समस्या दूर करू शकता. तसेच या भाजीचं नियमित सेवन केल्याने पोट साफ होतं, शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. फक्त ही भाजी करताना तेल न वापरता थोडं तूप वापरावं. इतकंच नाही तर जुलाब थांबवण्याचं कामही ही भाजी करते. या भाजीमध्ये फायबर भरपूर असल्याने पोट चांगलं राहतं आणि पोट भरलेलं राहतं. लघवी साफ होत नसेल तर ही समस्या सुद्धा या भाजीने दूर होते. त्यामुळे आठवड्यातून एक किंवा दोन वेळा ही भाजी खायची. जेणेकरून या समस्या तुमच्यापासून दूर राहतील".
तांदुळज्याच्या भाजीचे फायदे
तांदुळज्याची भाजी ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. या भाजीतून शरीराला सी जीवनसत्त्व मिळतात. या भाजीच्या सेवनाने शरीरातील विष कमी होतं, पित्त कमी होतं, मूळव्याध, मुतखडा असा समस्या दूर होतात. तसेच ही भाजी डोळ्यांसाठीही चांगली असते. इतकंच नाही तर या भाजीच्या सेवनाने उष्णता कमी करण्यासही मदत मिळते.