varicose veins causes : पायांकडे बघून तुम्हाला असं वाटतं का की, पायांच्या नसा इतरांच्या पायांच्या नसांच्या तुलनेत वेगळ्या दिसतात. जर तुमच्या पायांच्या नसा जास्त फुगलेल्या असतील तुम्हाला वॅरिकोज वेन्स समस्या असू शकते. कमी वयात किंवा सुरूवातीला या वेन्स जास्त त्रास देत नाहीत. पण जर याकडे जास्त काळ दुर्लक्ष केलं तर या नसा वेदनेचं कारण बनू शकतात.
वेरिकोज वेन्स ही समस्या सामान्यपणे पायांवर होते. खासकरून पंज्यांच्या आसपास जास्त दिसतात. या नसा वरच्या बाजूने जास्त जाड झालेल्या दिसतात. जे लोक जास्त वेळ उभे असतात, ज्यांच्या पायांवर प्रेशर जास्त असतं, त्या लोकांना ही समस्या जास्त होते. आयुर्वेदिक एक्सपर्ट डॉ. रेखा राधामोनी यांच्यानुसार, वेरिकोज वेन्स सामान्य नसांपेक्षा जास्त जाड आणि ट्विस्टेड वेन्स असतात. ज्या पायांवर दिसतात.
वेरिकोज वेन्स किती गंभीर समस्या?
जर तुम्हाला ही समस्या झाली आहे की नाही हे चेक करायचं असेल तर तुम्हाला पायांना बारकाईने बघावं लागेल. जर तुमच्या पायांवर गर्द निळ्या रंगाच्या नसा दिसत असतील, ज्या थोड्या जाड असतील तर समजून घ्या की, या वेरिकोज वेन्स आहेत. याकडे वेळीच लक्ष दिलं गेलं नाही तर या नसांमध्ये वेदना होऊ लागतात. ज्या वाढत्या वयासोबत असह्य होतात.
वेरिकोज वेन्स ही समस्या होण्याची ही वेगवेगळी कारणे असू शकतात. एक म्हणजे जास्त वेळ उभे राहणे. त्याशिवाय इतरही काही कारणांमुळे वेरिकोज वेन्सची समस्या होते. अनेक महिलांना प्रेग्नेन्सी दरम्यान वेरिकोज वेन्सचा सामना करावा लागतो. वजन वाढल्यामुळे पायांच्या नसा फुगतात. ज्या नंतर वेरिकोज वेन्सचं रूप घेतात. जास्त वयातही वेरिकोज वेन्सची समस्या होऊ शकते.
जास्त वेळ उभं राहणं टाळा
जर तुम्हाला वेरिकोज वेन्सची समस्या झाली असेल तर तर वेदना टाळण्यासाठी जास्त वेळ उभे राहू नका. पाय हवेत लटकवून जास्त वेळ बसणं देखील नुकसानकारक आहे. मधे ब्रेक घ्या. काही वेळ पायांवर चाला. याने तुम्हाला आराम मिळेल.
पाय उंच ठेवा
पाय सरळ ठेवले तर ब्लड फ्लो चांगला राहतो. जर तुम्ही बसलेले असाल तर पाय एखाद्या वस्तू सरळ ठेवा. यासाठी तुम्ही स्टूल किंवा स्टॅंडचा वापर करू शकता. झोपताना पायांकडून पलंग थोडा उंच ठेवा. यासाठी पलंगाच्या पायाखाली दोन्हीकडून वीटा किंवा काही वस्तू लावा. किंवा पायांना उंच ठेवण्यासाठी उशीचा वापर करू शकता.
योगा करा
वेरिकोज वेन्स शांत ठेवण्यासाठी तुम्ही काही योगासने करू शकता. ज्यात शीर्षासन, मेरूदंडासन, पादउत्तानासन आणि नौकासन करू शकता.
वर्कआउट कमी करा
जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी किंवा टोन्ड बॉडी मिळवण्यासाठी वर्कआउट करत असाल तर तुम्हाला या स्थितीत जास्त समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तुम्ही मोडरेट वर्कआउट करा. कारण जास्त वर्कआउट केल्याने वेरिकोज वेन्स जास्त प्रभावित होते.