Ayurveda Tips: आयुर्वेद एक चांगली चिकित्सा पद्धती आहे. जी आजाराला मुळापासून दूर करण्यास मदत करते. हे उपाय करून डायबिटीस, बद्धकोष्ठतासारखे आजार कंट्रोल करण्यास मदत मिळते. गॅस, त्वचारोग अशाही समस्या आयुर्वेदिक उपायांनी दूर होतात.
आयुर्वेदिक उपचार केल्यानंतरही अनेक रिझल्ट हवा तसा रिझल्ट मिळत नाही. अशात लोकांना वाटतं की, हे उपाय फायदेशीर नाहीत. पण चूक आपल्या पद्धतीत असते.
आयुर्वेदिक एक्सपर्ट डॉ. रेखा राधामोनी यांच्यानुसार, कमी माहिती असल्याकारणाने आयुर्वेदिक उपाय करताना आपण चुका करतो. त्यामुळे आपल्याला आयुर्वेदासंबंधी सत्य जाणून घेणं गरजेचं ठरतं.
आयुर्वेदिक डॉ. रेखा म्हणाल्या की, आयुर्वेद हे काही एक महिन्याचं एखादं चॅलेंज नाहीये. हा आयुष्यभराचा प्रवास आहे. ज्याने तुमचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत मिळते. केवळ काही काळ आयुर्वेदाचे नियम फॉलो करून समस्या पुन्हा होऊ शकते.
आयुर्वेदानुसार, प्रत्येक व्यक्तीचं शरीर वेगळं असतं. त्यांचं आरोग्य वेगळं असतं. त्यामुळे त्यांनी त्याच पदार्थांच सेवन करावं जे त्यांच्या आरोग्यासाठी चांगले आहेत. प्रत्येक हेल्दी फूड प्रत्येक आयुर्वेदिक प्रकृतीसाठी योग्य नसते.
डॉ. रेखा सांगतात की, प्रत्येक व्यक्तीच्या आजाराचा आयुर्वेदिक उपाय वेगळा असू शकतो. जुळ्या बहिण-भावांनाही वेगवेगळ्या उपचाराची गरज असू शकते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने एकसारखा उपचार घेऊ नये.
आयुर्वेदिक उपाय करताना संयम बाळगणं फार गरजेचं आहे. याचा रिझल्ट मिळायला थोडा वेळ लागू शकतो. तोपर्यंत तुम्ही सावधानी आणि नियमितता बाळगावी. आत्म-नियंत्रण ठेवावं.