Water Drinking Tips : मनुष्याचं पाण्याशिवाय जिवंत राहणं शक्य नाही. त्यामुळे 'पाणी हे जीवन आहे' असं म्हटलं जातं. पाणी प्यायल्याने आपली तहान तर भागतेच सोबत यातून शरीराला अनेक पोषक तत्वही मिळतात. मात्र, जास्तीत जास्त लोक पाणी पिताना काही चुका करतात. ज्यामुळे पाण्यातील पोषक तत्व शरीराला मिळत नाहीत. अशात आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या गंभीर समस्यांचा सामना करावा लागतो.
आयुर्वेद डॉ. डिंपल जागडा यांनी पिताना कोणत्या चुका करू नये याबाबतचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात त्यांनी सांगितलं की, पाण्यात भरपूर पोषक तत्व असतात जे शरीराच्या वेगवेगळ्या क्रिया पार पाडण्यासाठी महत्वाचे असतात. अशात जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने पाणी प्याल तर गंभीर आजारांचे शिकार होऊ शकता. हेल्दी राहण्यासाठी पाणी पिताना कोणत्या चुका करू नये याबाबत त्यांनी माहिती दिली.
प्लास्टिक बॉटलमधून पाणी पिऊ नये
डॉक्टरांनी एका रिसर्चचा हवाला देत सांगितलं की, प्लास्टिकच्या बॉटलने कधीच पाणी पिऊ नये. पाणी नेहमी माती, तांबे, स्टीलच्या भांड्यात स्टोर करून प्यावं. बॉटलच्या पाण्यात प्लास्टिकचे काही कण असतात. वैज्ञानिकांकडे जवळपास ८० टक्के लोकांच्या परीक्षणात मानवी रक्तामध्ये मायक्रोप्लास्टिक सापडले आहेत. हे प्लास्टिकचे कण शरीरात जमा होतात. ज्यामुळे सूज, कॅन्सर आणि डीएनए डॅमेज होण्याचा धोका असतो.
एक एक घोट घेऊन प्या
बरेच लोक ग्लास किंवा बॉटलने गटागट पाणी पितात. पण असं केल्याने तुम्ही योग्यपणे हायड्रेट होऊ शकत नाहीत. जेव्हा पाणी तुम्ही वेगाने पिता तेव्हा जे विषारी पदार्थ शरीरातून बाहेर निघायला हवेत ते निघत नाहीत. ते किडनी आणि मूत्राशयामध्ये जमा होतात.
उभे राहून पिऊ नये
आयुर्वेदानुसार, जेव्हा तुम्ही उभे राहून पाणी पिता, तेव्हा शरीराला पाण्यातील पोषक तत्व मिळू शकत नाहीत. कारण पाणी थेट पोटाच्या खालच्या भागात जातं. त्यामुळे पाणी नेहमीच खाली बसूनही प्यावे. जेणेकरून पोट आणि आतड्यांना आधार मिळेल. तसेच पाण्यातील पोषक तत्व आणि खनिज मिळू शकतील.