Rock salt benefits: मीठ वेगवेगळ्या प्रकारचं येतं. मिठाचे सगळे प्रकार आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. पांढरं मीठ, सैंधव मीठ म्हणजेच हिमालयन सॉल्ट, समुद्री मीठ, काळं मीठ अशी वेगवेगळी नावं असतात. मिठामुळे पदार्थांना चव तर येतेच सोबतच आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. पण मिठाचं जास्त सेवन केल्याने ब्लड प्रेशरही वाढतं. अशात ब्लड प्रेशर कंट्रोल ठेवण्यासाठी आयुर्वेदिक डॉक्टरांनी एक खास उपाय सांगितला आहे.
आयुर्वेदिक डॉक्टर दीक्षा भावसार यांनी सांगितलं की, सैंधव मिठाचं सेवन आरोग्यासाठी फायदेशीर असतं. याच्या रोजच्या सेवनाने शरीरात तीन दोष वात, कफ आणि पित्त संतुलित राहतात. त्यांनी सांगितलं की, हे एकमेव असं मीठ आहे ज्याने हार्ट आणि डोळ्यांसंबंधी आजार होत नाही. आयुर्वेदानुसार, सैंधव मीठ रोज खाल्ल्याने आरोग्य चांगलं राहतं. याचे अनेक फायदे एक्सपर्टने सांगितले आहेत.
कसं कराल सेवन?
रोज सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास साध्या पाण्यात अर्धा चमचा सैंधव मीठ मिक्स करू सेवन करावं.
सैंधव मीठ रोजच्या वापरासाठी फायदेशीर
आयुर्वेदीक एक्सपर्टने सांगितलं की, सैंधव मिठाचा वापर करून शरीर अनेक प्रकारच्या रोगांपासून मुक्त राहू शकतं. याने पचनात सुधारणा, पोटातील सुजेची समस्या करण्यात मदत मिळते. याने थंडावा आणि उर्जाही मिळते.
हार्ट ठेवतं निरोगी
आयुर्वेद एक्सपर्टनी सांगितलं की, सैंधव मीठ हार्टला निरोगी करण्याचं काम करतं. शिजलेल्या अन्नात अधिक प्रमाणात सोडिअम असतं. ज्याने हार्टसंबंधी समस्या जसे की, हाय ब्लड प्रेशर, हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढू शकतो. अशा सैंधव मिठाचा वापर करणं फायदेशीर असतं.
डोळ्यांसाठी फायदेशीर
आयुर्वेद एक्सपर्टने सांगितलं की, सैंधव मीठ हे असं एकमेव मीठ आहे जे डोळ्यांसाठी फायदेशीर असतं. रोज याचा आपल्या आहारात समावेश केल्याने डोळ्यांचा अनेक प्रकारच्या संक्रमणापासून आणि आजारांपासून बचाव होऊ शकतो.
पचनक्रिया सुधारते
हिमालयन सॉल्ट पचनक्रिया सुधारण्यास मदत करणाऱ्या एंजाइम्सला स्टिम्युलेट करतं. सोबतच हायड्रोक्लोरिक अॅसिडचं प्रमाण वाढवतं. याने अन्न पचण्यास मदत मिळते. हिमालयन सॉल्ट खाल्ल्याने शरीराला पोषण मिळतं.
मसल्स मजबूत होतात आणि डोकेदुखी थांबते
वेदना आणि क्रॅम्प्स इलेक्ट्रोलाइट बॅलन्स बिघडल्याने होते. सोडिअम व्यतिरिक्त हिमालयन सॉल्टमध्ये पोटॅशिअम, कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअमसारखे मिनरल्स असतात. या सर्वांचा आरोग्याला फायदा होतो. मॅग्नेशिअम अॅंटी-इनफ्लेमेटरी आहे ज्याने डोकेदुखीपासून आराम मिळतो.
पेशींना हायड्रेट ठेवतं
आपण जेवढं पाणी पितो त्या पूर्ण पाण्याचा शरीर उपयोग करू शकत नाही. त्यामुळे शरीरात अतिरिक्त पाणी जमा होतं. याने ब्लडचं सोडिअम डायल्यूट होतं आणि सोडिअमचं प्रमाण कमी होऊ लागतं. हिमालयन सॉल्सने शरीरात पाणी जमा होत नाही आणि पाण्याचा योग्य वापर होतो. याने शरीरातील पेशींना पोषण मिळतं.
एनर्जी वाढते
हिमालयन सॉल्टमध्ये मोठ्या प्रमाणात एनर्जी वाढवणारे मिनरल्स असतात. पाण्यासोबत हिमालयन सॉल्टचं सेवन केल्यास मिनरल्स वेगाने अब्जॉर्ब होतात. याने तुम्हाला एनर्जी मिळते.
चांगली झोप
रिसर्चमधून समोर आलं आहे की, हिमालयन सॉल्ट स्ट्रेस हार्मोन ऐड्रेनलिन आणि कार्टिसोल कमी करतं. ज्यामुळे तुम्हाला चांगली झोप येते. हिमालयन सॉल्टमध्ये भरपूर मॅग्नेशिअम असतं ज्याने तणाव आणि स्ट्रेस कमी होतो.
वजन कमी करण्यास मदत
हिमालयन सॉल्टने तुम्हाला वजन कमी करण्यास मदत मिळते. यात आढळणाऱ्या मिनरल्सने तुमची भूक कमी होते. सोबतच शरीरातून विषारी पदार्थही बाहेर काढले जातात. याने टेम्पररी वेट लॉससाठी मदत मिळते.