Right way to eating fruits : फळांचं सेवन केल्याने आरोग्याला किती फायदे मिळतात हे सगळ्यांनाच माहीत आहे. त्यामुळे लोक वेगवेगळ्या ऋतूंमधील फळांचं सेवन आवर्जून करतात. वेगवेगळ्या फळांमधून शरीराला फायबर, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स मिळतात. फळांचं सेवन करून पचन तंत्रही चांगलं राहतं. इम्यूनिटी बूस्ट होते आणि वेगवेगळ्या आजारांपासून व इन्फेक्शनपासून बचाव होतो. पण अनेक लोक फळं चुकीच्या पद्धतीने खातात आणि मग त्यांना यातून काही फायदे मिळत नाही. अशात आयुर्वेद डॉक्टर दीक्षा भावसार यांनी फळं खाण्याची योग्य पद्धत सांगितली आहे.
डॉक्टरांनुसार, प्रत्येक गोष्ट खाण्याचे काही नियम असतात. फळांनाही हे नियम लागू पडतात. चुकीच्या वेळी आणि चुकीच्या पद्धतीने फळांचं सेवन केलं तर आरोग्याचं नुकसान होऊ शकतं. आयुर्वेदनुसार, फळं फार हलके आणि पचायला सोपे असतात.
कधी खाऊ नये फळं?
जेवण करण्याआधी किंवा जड पदार्थांचे सेवन केल्यावर फळांचं सेवन केलं तर पोटासंबंधी काही समस्या होऊ शकतात. असं केल्याने पोटात फळं तोपर्यंत राहतात जोपर्यंत जड पदार्थ तुम्हाला पचत नाहीत. अशात पचनासंबंधी समस्या होतात. इतकंच नाही तर पाचन रसामुळे ही फळं जास्त पिकतात.
जड जेवणासोबत फळं खाण्याचे नुकसान
जे पदार्थ व्यवस्थित पचत नाही त्यांना शरीरातील विषारी पदार्थ म्हटलं जातं. हे पदार्थ आतड्यांमध्ये जमा होतात. ज्यामुळे पचनासंबंधी अनेक समस्या होतात. पोषक तत्वाचं अवशोषण व्यवस्थित होत नाही. तसेच आतड्यांवर यांमुळे सूजही येते. यामुळे फळं इतर कोणत्याही गोष्टीसोबत खाऊ नये. जेवण करताना किंवा जेवण केल्यावर अजिबात खाऊ नये.
आयुर्वेदानुसार फळं खाण्याच योग्य पद्धत
- फळं नेहमी जेवण करण्याच्या एक तास आधी किंवा जेवण केल्यावर 2 तासांनी खावेत.
- जेवणासोबत किंवा जेवण केल्यावर लगेच कधीच फळं खाऊ नये.
- फळं दूध किंवा दह्यासोबत मिक्स करू नका.
- फळांचं ज्यूस तेव्हाच सेवन करा जेव्हा तुम्हाला पचनासंबंधी समस्या आहे.
दुधासोबत कोणती फळं खाऊ शकता?
- दुधासोबत तुम्ही गोड आणि पिकलेली फळंच खाऊ शकता.
- एक पिकलेला आंबा दुधात मिक्स करून सेवन करू शकता.
- अॅवोकाडो दुधासोबत मिक्स करता येतं.
- किशमिश, खजूर आणि अंजीरसारखे सूके मेलेही दुधात मिक्स करू शकता.
दुधासोबत कोणती फळं खाऊ नये?
- कोणत्याही प्रकारच्या बेरीज दुधात मिक्स करून खाणं टाळा. जेव्हा बेरीज दुधात मिक्स केल्या जातात तेव्हा याने आरोग्याला वेगवेगळ्या समस्या होतात. सामान्यपणे दूध आणि फळांचं सेवन वेगवेगळं करणंच कधीही चांगलं.