Urinating After Meal : तुम्ही पाहिलं असेल की, बऱ्याच लोकांना जेवण झाल्यावर संडासला जाण्याची सवय असते. याचा अर्थ हा होतो की, त्यांची पचनक्रिया बिघडलेली आहे. मात्र, एक्सपर्ट सांगतात की, जेवण झाल्यावर लगेच लघवीला जाणं आरोग्यासाठी अनेकदृष्टीने खूप फायदेशीर ठरू शकतं. आयुर्वेद डॉक्टर वैद्य मिहिर खत्री यांनी याबाबतचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.
डॉ. मिहिर खत्री यांनी कवि घाघ यांच्या कवितेच्या 'खाइ के मूते सूते बाउ, काहे के बैद बसावे गाऊ'। ओळी शेअर केल्या. या ओळींचा अर्थ असा होतो की, जेवण केल्यावर लगेच लघवी केल्याने आणि डाव्या कडावर झोपल्याने गावात वैद्याची गरजच पडणार नाही. डॉक्टरांनी सांगितलं की, जेवण केल्यावर ही दोन कामे केल्याने तुम्ही नेहमीच निरोगी राहू शकता.
जेवणानंतर लघवीचे फायदे
डॉक्टर खत्री यांच्यानुसार, तुम्ही जेव्हाही जेवण कराल त्यानंतर लगेच लघवीला आवर्जून जा. याने किडनी निरोगी राहते आणि यासंबंधी आजारही होत नाहीत. तसेच ही सवय हृदयासाठीही फायदेशीर ठरते. वेगवेगळ्या हृदयरोगांचा धोका यामुळे कमी होतो.
डाव्या कडावर झोपण्याचे फायदे
डाव्या कडावर झोपण्याला वाम कुक्षी म्हटलं जातं. आयुर्वेदात जेवण झाल्यावर डाव्या कडावर झोपण्यास सांगण्यात आलं आहे. असं केल्याने अन्न चांगल्या पद्धतीने पचन होतं आणि पोटासंबंधी समस्याही दूर होतात. त्यामुळे ही सवय गरजेची आहे.तसेच अनेक रिसर्चमध्येही सांगण्यात आलं आहे की, डाव्या कडावर झोपल्याने हार्टबर्न म्हणजे अॅसिडिटीची समस्या कमी होते. या पोजिशनमध्ये झोपल्याने अन्न सहजपणे आतड्यांमधून जातं आणि पचनक्रिया व्यवस्थित होते.