सगळेच लोक द्राक्ष आवडीने खातात. याचे शरीराला अनेक फायदेही मिळतात. आयुर्वेदात द्राक्षाला सर्व फळांमध्ये सगळ्यात चांगलं फळ मानलं जातं. पण आजकाल द्राक्ष उगवण्यासाठी वेगवेगळ्या कीटकनाशकांचा वापर केला जातो. ज्यामुळे ते घातकही ठरू शकतात. अशात ते खाण्याआधी काय करावे हे सांगण्यात आले आहेत.
आयुर्वेद डॉक्टर दीक्षा भावसार यांच्यानुसार, निरोगी राहण्यासाठी आणि कीटकनाशक पोटात जाऊ नये यासाठी द्राक्ष चांगले धुतले पाहिजे. डॉक्टरांनी द्राक्ष धुण्याच्या काही पद्धती सांगितल्या आहेत.
एका बाउलमध्ये पाणी घया आणि त्यात 2 मोठे चमचे मीठ टाका व 2 चमचे बेकिंग सोडा टाका. यात नंतर द्राक्ष टाका. 5 मिनिटांसाठी ते तसेच राहू द्या. नंतर साध्या पाण्याने एकदा धुवून तुम्ही द्राक्ष खाऊ शकता.
आरोग्याला मिळतात अनेक फायदे
बाजारातून जेव्हा आपण द्राक्ष खरेदी करतो तेव्हा त्यात सगळेच गोड द्राक्ष मिळत नाहीत. त्यातील काही आंबट तर काही गोड असतात. पण सगळ्या प्रकारच्या द्राक्षाने शरीरातील वात, पित्त आणि कफ व आपल्या एकूण आरोग्यावर प्रभाव पडतो.