Teeth Whitening Powder: शरीराच्या इतर अवयवांप्रमाणे दातांची काळजी घेणंही फार गरजेचं असतं. चुकीच्या खाण्या-पिण्यामुळे आणि ओरल हायजीनची काळजी न घेतल्याने दातांवर पिवळेपणा येतो. तसा तर दातांवर पिवळेपणा येणं कोणता आजार नाहीये. पण जर हा पिवळेपणा दूर केला नाही तर तुम्हाला दात आणि हिरड्यांसंबंधी गंभीर समस्या होऊ शकतात.
अर्थातच दातांवरील पिवळेपणामुळे तुमचा कॉन्फिडेन्स आणि स्माइल कमी होऊ शकते. तसे तर दात साफ ठेवण्यासाठी आणि ते चमकदार बनवण्यासाठी काहीही खाल्ल्या-पिल्यावर गुरळा करणे किंवा दिवसातून दोनदा ब्रश करणे या उपायांचा समावेश आहे. दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी अनेक उपाय आहेत, पण काही उपायांनी दातांच्या इनेमलला नुकसान पोहोचू शकतं.
पिवळे दात पांढरे कसे करावे? नोएडाच्या सेक्टर 27 मधील आयुर्वेद क्लीनिकचे डायरेक्टर डॉक्टर कपिल त्यागी यांनी सांगितलं की, दातांवर जमा पिवळेपणा दूर करण्यासाठी डेंसिस्ट कमीत कमी दोन हजार रूपये फी घेतात. त्याशिवाय बाजारात मिळणारे अनेक औषधं महागडी असतात. त्यात हानिकारक केमिकलही असतात. तुम्ही दातांवरील पिवळेपणा दूर करण्यासाठी आयुर्वेदिक घरगुती उपाय करू शकता.
दातांना चमकदार करण्याचं आयुर्वेदिक पाउडर
हे पावडर तयार करण्यासाठी एक चमचा संधैव मीठ, एक चमचा लवंग पावडर, एक चमचा दालचीनी, एक चमचा ज्येष्ठमध, कडूलिंबाची सुकलेली काही पाने आणि सुकलेल्या पुदीन्याची पाने हवीत.
कसं कराल तयार?
वर सांगण्यात आलेले साहित्य बारीक करून चूर्ण तयार करा. तुमचं पाडवर तयार आहे. हे पावडर एका एअर टाइट डब्यात स्टोर करा.रोज थोड हे पावडर घ्या आणि ब्रशच्या मदतीने दात स्वच्छ करा. नंतर पाण्याने तोंड धुवा. एक आठवडा जरी तुम्ही या पावडरने दात स्वच्छ केले तर तुम्हाला लगेच बदल दिसू लागेल.
यात काय आहे खास
यातील संधैव मीठ हे तुमच्या दातांना नॅच्युरल पद्धतीने पाढरं करतं. तर ज्येष्ठमध आणि कडूलिंबामुळे हिरड्यांचं आरोग्य चांगलं राहतं. संवेदनशील दात असलेल्या लोकांसाठीही हे पावडर फार फायदेशीर आहे. दालचीनी आणि लवंगमुळे दात दुखणं बंद होतं.