Cause of bloating : अनेकदा काही लोकांना पोट सतत भरलेलं जाणवतं किंवा थोडं जरी खाल्लं तरी पोट भरतं. तुम्हालाही पोटात गॅस किंवा जडपणा जाणवतो का? जर उत्तर हो असेल तर समजून घ्या की, तुम्ही पोट फुगणं म्हणजे ब्लोटिंगच्या समस्येने ग्रस्त आहात. ब्लोटिंग एक कॉमन पचनासंबंधी समस्या आहे. जी बऱ्याच लोकांना होते. ही समस्या छोटी वाटत असली तरी छोटी नाहीये. चला जाणून घेऊ याची कारणे...
जास्त काळापासून असं होत असेल तर हा पचन तंत्रात गडबड असण्याचा संकेत आहे. असं झाल्याने भूक कमी होणे, पोषक तत्व अब्सॉर्ब न हेणे आणि शारीरिक कमजोरीही होऊ शकते. आयुर्वेद डॉक्टर वारा लक्ष्मी यांनी सांगितलं की, कोणत्या चुकांमुळे तुम्हाला ही समस्या होते आणि या समस्येपासून वाचण्यासाठी तुम्ही काय करायला हवं.
आतड्या सेन्सिटिव्ह असणं आणि फूड इनटॉलरेन्स
जर तुम्हाला फूड इनटॉलरेन्स असेल तर तुमचं शरीर काही प्रकारचा आहार योग्यपणे पचवत नाहीये. याने पोटात गॅस, सूज आणि अस्वस्थता होऊ शकते. जर तुमच्या आतड्या सेन्सिटिव्ह असतील तर काही खाद्य पदार्थांच्या थोड्या खाण्यानेही सूज आणि अस्वस्थता जाणवू शकते.
जेवण करताना जास्त बोलणं आणि पाणी पिणं
जेव्हा तुम्ही जेवण करता तेव्हा तुमच्या शरीराला अन्न पचवण्यासाठी ऊर्जेची गरज असते. जर तुम्ही जेवताना फार जास्त पाणी पित असाल तर याने तुमच्या पचन तंत्रावर जास्त दबाव पडतो आणि पचनक्रिया हळुवार होते. याने सूज आणि अस्वस्थता वाढते.
भूकेपेक्षा जास्त खाणे
जेव्हा तुम्ही भूकेपेक्षा जास्त खाता तेव्हा तुमच्या पोटाला अन्न पचवण्यासाठी जास्त मेहनत करावी लागते. ज्यामुळे पोट फुगतं आणि अस्वस्थता वाढते.
बचावासाठी काय कराल
डॉक्टरांनी सांगितलं की, तुम्ही तुमच्या खाण्याच्या सवयी आणि जीवनशैलीत छोटे मोठे बदल करून ही समस्या दूर करू शकता. सूज कमी करण्यासाठी आणि पचन सुधारण्यासाठी खाली सांगण्यात आलेली कामे करा.
- अन्न हळूहळू आणि चांगलं चाऊन खावं.
- काही फूड कॉम्बिनेशनने ही समस्या वाढते, जे खाणं टाळलं पाहिजे.
- जेवण झाल्यावर थोड्या वेळाने पाणी प्या.
- जेवताना बोलू नका.