Teeth Home Remedies : दात आणि हिरड्यांसंबंधी समस्यांकडे नेहमीच लोक दुर्लक्ष करतात. हेच कारण आहे की, बरेच लोक अनेकदा हिरड्यांमधून रक्त येणं, पायरिया, दात काळे पडणे, वेदना, दात पिवळे होणे किंवा तोंडाची दुर्गंधी येणे अशा समस्यांनी पीडित राहतात. तुम्हाला दातांच्या या समस्या लहान वाटू शकतात. पण जेव्हा या समस्या गंभीर रूप घेतात. तेव्हा तुम्हाला खूप जास्त त्रास होतो.
उदाहरण सांगायचं तर दाताला किड लागल्यावर जेव्हा वेदना होतात तेव्हा रूग्णाचं जगणं मुश्किल होतं. याच प्रमाणे डेंटल सेंसिटिव्हिटी झाल्यावर थंड-गरम लागल्याने दातांना झिणझिण्या होतात. जे फार त्रासदायक असतं. त्याशिवाय पायरियासारख्या हिरड्यांची समस्या तुमच्यासाठी लाजिरवाणी ठरू शकते. यामुळे इतरही अनेक समस्या होतात. प्रसिद्ध आयुर्वेद डॉक्टर दीपक कुमार यांनी या समस्या दूर करण्याचा एक सोपा आयुर्वेदिक सांगितला आहे.
मोहरीचं तेल आणि हळद
डॉक्टरांनी सांगितलं की, मोहरीचं तेल आणि हळद दातांसंबंधी समस्या दूर करण्यासाठी रामबाण उपाय आहे. यासाठी मोहरीच्या तेलामध्ये थोडी हळद आणि खाण्याचा थोडा सोडा मिक्स करा. सकाळी आणि रात्री झोपण्याआधी हे मिश्रण दातांवर घासल्याने काही दिवसात दातांची समस्या दूर होईल.
दातांची वेदना आणि हिरड्यांमधून रक्त होईल बंद
डॉक्टरांचं मत आहे की, हा उपाय दातांचं दुखणं दूर करण्यासाठी फायदेशीर आहे. कारण याने केवळ दातांचं दुखणं दूर होत नाही तर हिरड्यांमधून रक्त येणंही बंद होऊ शकतं. तसेच दातांमध्ये पस किंवा घाण जमा होत असेल तेही दूर होईल.
मजबूत होतील दात
मोहरिच्या तेलात हळद आणि सोडा मिक्स करून ब्रश केल्याने दातांची वरील सफाई होते. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की, याने हिरड्यांतील घाणही साफ होते व हिरड्यांची मूळं मजबूत होतात.