Rock salt benefits: मीठ आहारात सोडिअमचं मुख्य स्त्रोत असतं. बाजारात वेगवेगळ्या प्रकारचं मीठ मिळतं. ज्यांना पांढरं मीठ, सैंधव मीठ, समुद्री मीठ, काळं मीठ अशी वेगवेगळी नावं असतात. अर्थातच मिठामुळे अनेक पदार्थांना चव मिळते, पण याचं सेवन करताना काळजी घेणंही गरजेचं आहे. कारण याचं प्रमाण शरीरात जास्त झालं की, ब्लड प्रेशरही वाढतं. मिठाचा प्रभाव हा त्याच्या प्रकारावर अलवंबून असतो. जवळपास सर्वच कच्चे खाद्य पदार्थ भाज्या, फळं, नट्स मीट, कडधान्य आणि डेअरी पदार्थांमध्ये सोडिअमचं प्रमाण कमी असतं. त्यामुळे वरून मीठ न खाण्याचा सल्ला दिला जातो.
आयुर्वेदिक डॉक्टर ऐश्वर्या संतोष यांनी सांगितलं की, सैंधव मिठाचं सेवन आरोग्यासाठी फायदेशीर असतं. याच्या रोजच्या सेवनाने शरीरात तीन दोष वात, कफ आणि पित्त संतुलित राहतात. त्यांनी सांगितलं की, हे एकमेव असं मीठ आहे ज्याने हार्ट आणि डोळ्यांसंबंधी आजार होत नाही.
आयुर्वेदानुसार, सैंधव मीठ रोज खाल्ल्याने आरोग्य चांगलं राहतं. याचे अनेक फायदे एक्सपर्टने सांगितले आहेत. त्याआधी हे जाणून घेऊ की, मिठाच्या अधिक सेवनाने शरीराला कोणते नुकसान होतात.
किती प्रमाणात करावं मिठाचं सेवन?
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन WHO नुसार, एका वयस्क व्यक्तीने रोज 5 ग्रॅमपेक्षा कमी मिठाचं सेवन करावं. त्यासोबतच असंही मानलं जातं की, जेवणात वरून मीठ घेतल्याने शरीरात अनेक आजार तयार होतात.
जास्त मीठ खाण्याचे साइड इफेक्ट्स
- हार्ट फेल
-हाय बीपी
- किडनी रोग
- ऑस्टियोपोरोसिस
- पोटाचा कॅन्सर
- हार्ट स्ट्रोक
सैंधव मीठ रोजच्या वापरासाठी फायदेशीर
आयुर्वेदीक एक्सपर्टने सांगितलं की, सैंधव मिठाचा वापर करून शरीर अनेक प्रकारच्या रोगांपासून मुक्त राहू शकतं. याने पचनात सुधारणा, पोटातील सुजेची समस्या करण्यात मदत मिळते. याने थंडावा आणि उर्जाही मिळते.
हार्ट ठेवतं निरोगी
आयुर्वेद एक्सपर्ट ऐश्वर्या संतोष यांनी सांगितलं की, सैंधव मीठ हार्टला निरोगी करण्याचं काम करतं. शिजलेल्या अन्नात अधिक प्रमाणात सोडिअम असतं. ज्याने हार्टसंबंधी समस्या जसे की, हाय ब्लड प्रेशर, हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढू शकतो. अशा सैंधव मिठाचा वापर करणं फायदेशीर असतं.
डोळ्यांसाठी फायदेशीर
आयुर्वेद एक्सपर्टने सांगितलं की, सैंधव मीठ हे असं एकमेव मीठ आहे जे डोळ्यांसाठी फायदेशीर असतं. रोज याचा आपल्या आहारात समावेश केल्याने डोळ्यांचा अनेक प्रकारच्या संक्रमणापासून आणि आजारांपासून बचाव होऊ शकतो.