Ayurveda Tips for Monsoon Food: पावसाळा सुरू होताच अनेकांना खोकला, सर्दी, गळा खऱाब होणे, कफ किंवा ताप अशा समस्या सुरू होतात. अनेकांच्या लक्षात येत नसेल की, असं का होत आहे. याचं कारण वातावरण नाही तर तुमचा आहार असतो. आयुर्वेदानुसार, वातावरण बदलताच आपल्याला आहारातही बदल करायला हवा. असं केलं नाही तर त्या आहाराचे गुण बदलतात आणि त्यांचे फायदे होण्याऐवजी नुकसान अधिक होतात.
आयुर्वेदात आजारी न पडण्यासाठी काय करावं किंवा कोणती औषधं घ्यावी हे सांगितलं जातं. या हिशेबाने आयुर्वेद आपल्याला शरीर फीट ठेवण्यासाठी आणि उपाचाराचे उपाय सांगतं. आयुर्वेदात सांगण्यात आलं आहे की, पावसाळ्यात पोटातील पचन अग्नि कमजोर होते. अशात आहारात बदल करणं गरजेचं असतं. जे आपल्या शरीराला उष्णता देतील आणि पचनक्रियेत मदत करतील असेच पदार्थ खायला हवेत.
पावळ्यात आंबट पदार्थ खावेत का?
हेच कारण आहे की, पावसाळ्यात दही, लोणचं किंवा इतर आंबट पदार्थ खाण्यास मनाई केली जाते. अशाप्रकारचे चिकट पदार्थ खाणं टाळलं पाहिजे. या पदार्थांमुळे पावसाळ्यात कफ तयार होतो, ज्यामुळे खोकला येतो. सोबतच पचनक्रियाही योग्यप्रकारे होत नाही. पावसाळ्यात या पदार्थांचं सेवन केलं तर घसा खराब होतो, पोटात गडबड होते आणि तापही येऊ शकतो.
गरम मसाल्यांचा जास्त वापर
आयुर्वेदात सांगण्यात आलं आहे की, पावसाळ्यात शरीराचं तापमान योग्य ठेवण्यासाठी आलं, सुंठ, हींग, काळे मिरे आणि गव्हाचं सेवन करावं. पावसाळ्यात शरीरातील दोष दूर करण्यासाठी चटकदार आणि गोड पदार्थ खावेत. गव्हाच्या चपात्या खाव्यात. ज्याने शरीराला आतून उष्णता मिळते.
आलं, लवंग, वेलचीचे फायदे
पावसाळ्यात अनेक सण-उत्सव असतात. या दरम्यान तयार केलेल्या मिठायांमध्ये मखाना, चिरंजी, कलिंगडाच्या बीया, खोबरं आणि कमळाच्या बियांच्या वापर केला जातो. या दिवसांमध्ये आलं, लवंगसहीत इतरही गरम मसाल्यांचं सेवन वाढवलं जातं. ज्यामुळे आपल्या शरीराला या दिवसात पोषण मिळतं.