Yellow Teeth : बऱ्याच लोकांना दातांच्या वेगवेगळ्या समस्या असतात. जास्तीत लोकांना दात पिवळे होण्याचा समस्या असते. दात पिवळे होण्याची कारणे वेगवेगळी असतात. महत्वाचं कारण म्हणजे लोक शरीराची खूप काळजी घेतात, पण तोंडाच्या आरोग्याकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे दातांच्या समस्या वाढतात.
एक्सपर्टनुसार, जास्तीत जास्त लोकांना दात पिवळे होणे, हिरड्यांमध्ये वेदना, दात दुखणे, पायरिया, किड लागणे, तोंडातून दुर्गंधी येणे आणि दात कमजोर होणे अशा समस्या होतात. अशात डॉक्टरांनी काही आयुर्वेदिक जडीबुटींच्या मदतीने दात चमकदार आणि निरोगी ठेवण्याच्या टिप्स दिल्या आहेत.
आंबे आणि पेरूची पाने
आंबे आणि पेरूची पाने दातांवर घासल्याने ते पांढरे होण्यास मदत मिळते. ही हिरवी पाने इनेमल क्लीनरच्या रूपात काम करतात. यासाठी तुम्हाला लसूण, सैंधव मीठ, पेरू आणि आंब्याची पाने बारीक करून पावडर बनवा. हे पावडर रोज दातांवर घासा. याने हिरड्याही मजबूत होतात.
बाभळीच्या फांद्या आणि पाने
दात पांढरे करण्यासाठी आणि दातांची समस्या दूर करण्यासाठी बाभळी एक शक्तीशाली जडीबुटी आहे. या जडीबुटीमध्ये अॅंटी- मायक्रोबियल गुण असतात. बाभळीची पाने किंवा फांद्या चावल्याने अॅंटी-बॅक्टेरिअल एजंट रिलीज होतात. बाभळीच्या कोवळ्या फांद्यांचा टूथब्रशसारखा वापर करू शकता. बाभळीमध्ये आढळणारं टॅनिन दात चमकदार करतं.
वडाची फांदी
वडाच्या कोवळ्या फांदीचा तुम्ही टूथब्रशसारखा वापर करू शकता. या फांदीने दात घासले तर खूप फायदा होतो. याने दात केवळ चमकदारच नाही तर दात आणि हिरड्यांचं आरोग्यही चांगलं राहतं.
कडूलिंब
दातांचा पिवळेपणा घालवायचा असेल आणि दात चमकदार करायचे असतील तर कडूलिंबाचं झाड एक बेस्ट उपाय आहे. कडूलिंबाच्या फांद्यांचा वापर आजही भारतात टूथब्रश म्हणून वापर करतात. कडूलिंबाच्या तेलामध्ये अॅंटी-सेप्टिक गुण असतात. ज्यामुळे तोंडाची दुर्गंधी दूर होते. दातांमधील कीटाणू दूर होतात आणि दातांना किड लागण्याची समस्या दूर होते.
तुळशी
तुळशीची काही पाने वाळवा, त्यांचं पावडर तयार करा आणि हे पावडर बोटाने दातांवर घासा. तुळशीच्या पानांमुळे दातांची चांगली स्वच्छता होते आणि दात चमकदार होतात. याने पायरिया म्हणजे हिरड्यातून रक्त येण्यासारखी समस्या दूर होते.