शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

Ayurvedic treatment of Covid-19:  कोरोनापासून वाचण्यासाठी आयुष मंत्रालयानं सांगितला घरगुती उपाय, वाचा पूर्ण यादी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2022 12:48 PM

Omicron variant: कोरोना व्हायरसवर काही ठोस उपाय नाही. सध्या लसीकरण आणि इम्युन पॉवर मजबूत करण्यावरच भर दिला जात आहे

नवी दिल्ली – कोरोना व्हायरस महामारीचा प्रार्दुभाव पुन्हा एकदा वाढत असल्याचं दिसून येत आहे. ओमायक्रॉन व्हेरिएंटचा शिरकाव झाल्यापासून रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. केंद्रीय आयुष मंत्रालयाने अलीकडेच कोरोनापासून बचावासाठी आयुर्वैदिक उपायांबाबत नवी यादी जारी केली आहे. लोकांना निरोगी राहण्यासाठी आणि संक्रमणापासून वाचवण्यासाठी प्रत्येक प्रयत्न करायला हवेत असं केंद्र सरकारने म्हटलं आहे.

कोरोनाच्या नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन हा अतिशय वेगाने संक्रमण पसरवणारा घातक व्हेरिएंट होत असल्याचं समोर आलं आहे. या आजाराने संक्रमित रुग्णांमध्ये सर्दी-तापासारखी लक्षणं आढळतात. सध्या थंडीचे दिवस असल्याने सर्दीची लक्षणं धोकादायक ठरत आहेत. बहुतांश लोकं ताप-सर्दी आणि ओमायक्रॉनच्या लक्षणांमध्ये गोंधळून जात आहेत. ज्यामुळे सहजपणे ते या व्हेरिएंटच्या विळख्यात अडकत आहेत.

कोरोना व्हायरसवर काही ठोस उपाय नाही. सध्या लसीकरण आणि इम्युन पॉवर मजबूत करण्यावरच भर दिला जात आहे. सध्या आरोग्य तज्ज्ञ हेल्दी डाइट आणि इम्युन पॉवर वाढवण्याचा सल्ला देत आहेत. घरगुती उपचाराद्वारे इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी आणि कोरोना बचावासाठी आयुष मंत्रालयाने काही उपाय ठेवले आहेत.

कोरोनापासून बचाव करण्यासाठी दिवसभरात अनेक वेळा गरम पाणी प्या. दिवसातून किमान ३० मिनिटे योग, प्राणायाम आणि ध्यान करा. हळद, जिरे, धणे असे मसाले जरूर खावेत. स्वयंपाक करताना लसणाचा वापर करावा.

सकाळी १० ग्रॅम च्यवनप्राश घ्या. मधुमेहींनी साखरमुक्त च्यवनप्राश सेवन करावे. तुळस आणि दालचिनीपासून बनवलेल्या हर्बल टी/काढा सेवन करावे. दालचिनी, काळी मिरी, सुंठ आणि बेदाणे यांचे सेवन दिवसातून एक किंवा दोनदा करावे. गूळ आणि लिंबाचा रस घ्या. दिवसातून एकदा हळदीच्या गरम दुधाचे सेवन करा.

तिळाचे तेल/खोबरेल तेल किंवा तूप नाकपुडीमध्ये सकाळ संध्याकाळ लावावे. तेल ओढण्याची थेरपी वापरा. यासाठी एक चमचा तीळ किंवा खोबरेल तेल तोंडात २ ते ३ मिनिटे चोळा. हे दिवसातून एक किंवा दोनदा करता येते.कोरडा खोकला आणि घसादुखीवर पुदिन्याची ताजी पाने आणि आले यांची वाफ घ्या. २-३ कळ्यांचे चूर्ण गूळ किंवा मधात मिसळून घ्यावे.

कोरोनाला रोखण्यासाठी सर्व नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे आयुष मंत्रालयाने म्हटले आहे. घरगुती उपायांनी कोरोनाला पूर्णपणे रोखता येत नाही, त्यामुळे कोरोनाशी संबंधित आवश्यक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे आवश्यक आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की लोकांनी मास्क घालणे, हात चांगले धुणे, शारीरिक आणि सामाजिक अंतर पाळणे, लसीकरण, निरोगी आहार आणि इतर आरोग्य सेवा यासारख्या नियमांचे पालन केले पाहिजे.

कोरोनापासून बचाव आणि उपचारासाठी आयुष मंत्रालयाने दिलेली पूर्ण यादी वाचण्यासाठी यावर क्लिक करा

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOmicron Variantओमायक्रॉन