शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय वादांचे बॉम्ब, निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोपांचे फटाके, नवनवीन मुद्दे आणि वादग्रस्त वक्तव्यांची मालिका
2
आजचे राशीभविष्य, ८ नोव्हेंबर २०२४ : प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल, खर्चाचे प्रमाण वाढेल
3
कांदा ८०, लसूण ५०० रुपये किलो! निवडणुकीच्या तोंडावर दरवाढ, सर्वपक्षीय उमेदवारांना टेन्शन
4
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
5
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
6
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
7
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
8
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
9
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
10
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
11
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
12
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
13
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
14
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
15
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
17
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
18
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
19
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

Health Tips: तुमच्या या सवयींमुळे मेंदुच्या कार्यक्षमतेवर होतो भयंकर परिणाम, आजच सोडा; अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2022 4:50 PM

मेंदू नीट काम करत नसेल तर अनेक अडचणी निर्माण होतात, जाणून घेऊया अशा ४ गोष्टींविषयी ज्यामुळे आपला मेंदू नीट काम करत नाही.

मेंदू (brain) हा आपल्या शरीरातील अतिशय महत्त्वाचा भाग आहे. मेंदूकडून आपल्या पूर्ण शरीरावर नियंत्रण ठेवलं जातं. मेंदूचं कार्य नीट होणं गरजेचं असतं. मेंदूचा योग्य वापर करून अनेक लोक यशस्वी होतात. आपण जितका मेंदू शांत ठेवून त्याला कोणत्या तरी कामात नेहमी गुंतवून ठेवतो तेवढा अधिक चांगला काम (Harmful Habits for brain) करतो.

आपण जे खातो त्यातील आवश्यक पौष्टिक घटकांमुळेच मेंदूला चालना मिळत असते. त्यानेच आपली वाढ होत असते. त्याशिवाय बदलत्या काळासोबत मानसिक आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठीही प्रयत्न करावे लागतात. मेंदू नीट काम करत नसेल तर अनेक अडचणी निर्माण होतात, जाणून घेऊया अशा ४ गोष्टींविषयी ज्यामुळे आपला मेंदू नीट काम करत नाही.

गोड जास्त खाणं -भारतीय लोकांना गोड-धोड खाण्याची फार आवड असते. अनेकजण जेवणानंतर गोड पदार्थ खाण्यावर भर देतात. जेवल्यानंतर चालावे, असे सांगितले जाते, मात्र ते अनेकांकडून होत नाही. आपण व्यायाम करू शकत नसाल तर गोड पदार्थ जास्त खाणं वेळीच टाळा. यामुळे मधुमेहाचा धोका वाढतो आणि भविष्यात विसरण्याचा त्रास वाढत जातो.

पुरेशी झोप घेणं -नीट झोप घेणं गरजेचं आहे, आपण फक्त 5 ते 6 तासच झोप घेत असेल तर त्याचा परिणाम आपल्या कार्यक्षमतेवर दिसून येतो. मेंदू नीट काम करण्यासाठी त्याला पुरेशी विश्रांती देणंही गरजेचं आहे.

छोट्या-छोट्या गोष्टींवरून रागावणे -अनेकजण छोट्या-छोट्या गोष्टींवरून चिडतात-रागावतात, तुम्हाला नकळत अशी सवय लागली असेल तर चिडचिडेपणावर वेळीच नियंत्रण ठेवा. सतत चिडणे-रागावणे यामुळे मेंदूच्या ब्लड सेल्सवर प्रेशर वाढतं. यामुळे नंतर तो व्यक्ती मानसिक आजारी पडू शकतो. यामुळे ब्रेन हॅमरेजचाही त्रास होऊ शकतो. याचा आपल्या विचार करण्याच्या समजून घेण्याच्या शक्तीवर परिणाम होतो.

मेंदूचं कार्य दिवसभर चांगलं राहण्यासाठी आपला आहारही चांगला ठेवण्याची आवश्यकता असते. आपला मेंदू नेहमी एकाग्रतेने काम करण्यासाठी त्याला आवश्यक पोषक घटकही मिळणं गरजेचं आहे. मेंदूच्या आरोग्यासाठी विशेषतं: खसखस, बदाम, ड्रायफ्रुट्स, दूध यांचा समावेश असायला हवा. यामुळे आपला मेंदू अधिक गतीनं काम करू शकतो.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स