Banana Stem Juice : केळी खाण्याचे शरीराला किती फायदे मिळतात हे सगळ्यांनाच माहीत आहे. वजन वाढवणं असो, पोटाच्या समस्या दूर करणं असो वा भरपूर व्हिटॅमिन्स मिळवणं असो केळी वेगवेगळ्या कामात येतात. केळी हे एक परिपूर्ण आहार म्हटलं जाणारं असं फळ आहे. केळी खाल्ल्याने आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. पण अनेकांना केळीच्या खोडाचे फायदे माहीत नसतात. केळीच्या खोडाचा ज्यूस शरीरासाठी किती फायदेशीर ठरतो हे आज आपण जाणून घेणार आहोत.
आयुर्वेद डॉ. डिंपल यांनी केळीच्या खोडाच्या ज्यूस पिण्याचे फायदे, पिण्याची योग्य वेळ सांगितली आहे. केळीच्या खोडाचा ज्यूस प्यायल्याने फॅटी लिव्हरसारखी समस्या दूर होण्यास मदत मिळते. तसेच शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून शरीर आतून स्वच्छ करण्यासही मदत होते. केळीच्या खोडाच्या ज्यूसमधून शरीराला कॅल्शियम, व्हिटॅमिन बी6, पोटॅशिअम, आयर्न आणि मॅग्नेशिअम मिळतं.
फॅटी लिव्हर समस्या होईल दूर
फास्ट फूड, जंक फूड आणि अधिक मद्यसेवनामुळे लिव्हरवर फॅट जमा होतं. पुढे जाऊन लिव्हर सिरोसिस आणि कॅन्सरचा धोकाही वाढतो. अशात केळीच्या खोडामधील अॅंटी-ऑक्सिडेंट कोलेस्ट्रॉल दूर करतं ज्यामुळे लिव्हरवरील फॅटही दूर होतं.
बॉडी डिटॉक्स
आतड्यांची स्वच्छता होत नसल्याने अनेक पोटासंबंधी समस्या होत राहतात. या ज्यूसमुळे लोअर डायजेस्टिव सिस्टीममधील सगळे ब्लॉकेज दूर होतात. यामुळे तुमचं पचन वाढतं आणि पोटातील चरबीही लगेच कमी होते.
कुणी प्यावा हा हेल्दी ज्यूस?
डॉक्टरांनुसार ज्या लोकांना एनीमिया, हाय कोलेस्ट्रॉल, हाय ब्लड प्रेशरची समस्या असेल तर त्यांनी आवर्जून या ज्यूसचं सेवन करावं. पण किडनीची समस्या असेल तर जरा काळजी घ्यावी.
पिण्याची वेळ आणि पद्धत
डॉ. डिंपल यांच्यानुसार यापासून फायदा मिळवण्यासाठी ७ ते १० दिवस हा ज्यूस रोज सकाळी रिकाम्या पोटी ३० ते १० मिली प्यावा. केळीच्या खोडाच्या ज्यूसने हळूहळू तुमची समस्या दूर होईल.