कोरोनावर मात करण्यासाठी संपूर्ण जग प्रयत्नशील आहे. कोरोनाप्रतिबंधक लसींची निर्मिती झाली. बूस्टर डोसही आला. काही कॅप्सूलही बाजारात आल्या आहेत. आता त्यात दोन आणखी नव्या औषधांची भर पडली आहे. या सगळ्यांचा हेतू एकच आणि तो म्हणजे कोरोनाला लवकरात लवकर हद्दपार करणे.
डब्ल्यूएचओची मान्यता...जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) कोरोनाबाधितांवरील उपचारासाठी दोन औषधांना मान्यता दिली आहे.ही दोन्ही औषधे कोरोनाबाधितांची अवस्था गंभीर असेल त्यावेळी दिली जाणे अपेक्षित आहेत. बाधितांसाठी ती संजीवनी ठरणार असून त्यामुळे मृतांची संख्या घटणार आहे.बेरिसिटिनिबहे औषध ऱ्हूमटॉइड आर्थरायटिसवरील उपचारासाठी वापरले जाते.ते कोरोनाबाधितांना दिल्यास त्यांना कृत्रिम श्वसनयंत्रणेवर ठेवण्याइतपत परिस्थिती गंभीर होत नाही. स्टेरॉइड्सच्या साथीने ते देण्याचा सल्ला डब्ल्यूएचओने दिला आहे.सोट्रोविमॅबसौम्य लक्षणे पण परंतु जोखीम उच्च स्वरूपाची आहे, अशा कोरोना रुग्णांना हे औषध देण्याचा सल्ला देण्यात आला आहे.कासिरिव्हिमॅब आणि इम्डेव्हिमॅब हे अँटिबॉडी कॉकटेल देण्यासही डब्ल्यूएचओने मंजुरी दिली आहे.डब्ल्यूएचओची मंजुरी मिळालेली औषधेटोसिलिझुमॅब आणि सरिलुमॅब या दोन औषधांना आणि सिंथेटिक अँटिबॉडी ट्रीटमेंट रिजनरोन या औषधाला मंजुरी दिली आहे.भारतात मिळतात?देशात कासिरिव्हिमॅब आणि इम्डेव्हिमॅब हे अँटिबॉडी कॉकटेल उपलब्ध आहे.अनेक आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टर यांना कोरोनाची बाधा झाल्यावर मोनोक्लोन अँटिबॉडी इंजेक्शन दिले जात आहे.या औषधाने चार-पाच दिवसांतच कोरोनाची लक्षणे गायब होतात.