मधुमेह हा असा आजार आहे की, एकदा तो झाल्यास पीडित व्यक्तीला आयुष्यभर औषधे घ्यावी लागतात. यासोबतच आपली जीवनशैली आणि आहार यावर विशेष लक्ष द्यावे लागते. मधुमेहासोबत इतरही अनेक समस्या येतात. त्यामुळे रुग्णाची दृष्टी कमी होण्याचा धोका, किडनीशी संबंधित समस्या, हृदयविकाराचा झटका आणि इतर अनेक गंभीर आजार वाढू शकतात. मधुमेहावर आजपर्यंत कायमस्वरूपी इलाज नाही. यामुळेच हा आजार होणे ही चिंतेची बाब आहे. मात्र तुमच्या आहारात आणि जीवनशैलीत बदल करून तुम्ही नक्कीच मधुमेहावर नक्कीच नियंत्रण मिळवू शकता.
मधुमेहाचे बहुतेक रुग्ण खाण्यापिण्याची काळजी घेतात, पण या सगळ्यामध्ये ते आपल्या त्वचेची काळजी घेणे विसरतात. थंडीत प्रत्येकाची त्वचा कोरडी पडते. तसेच प्रचंड थंडी असल्याने प्रत्येक हिवाळ्यात सर्वजण अधिक गरम पाण्याने आंघाळ करतात. त्यामुळे आपल्या त्वचेची आर्द्रता नष्ट होते. अनेकदा लोक या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. मात्र मधुमेह असणाऱ्या लोकांना याकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं.
अनेक वेळा गरम पाण्याने आंघोळ केल्याने त्वचेचे खूप नुकसान होऊ शकते. त्वचेशी संबंधित समस्या मधुमेहाच्या रुग्णांमध्ये नैराश्य आणि तणाव वाढवू शकतात. मधुमेहाच्या रुग्णांनी गरम पाण्याने अंघोळ केल्याने त्वचेवर सूज येऊ शकते. गरम पाण्यामुळे त्वचेला निस्तेजपणा, खाज सुटणे आणि लालसरपणा येण्याची शक्यता आहे.
दररोज गरम पाण्याने अंघोळ केल्याने त्वचेतील ओलावा कमी होतो. त्वचा निरोगी ठेवण्यासाठी नैसर्गिक तेल, प्रथिने आवश्यक असतात. परंतु गरम पाण्याने अंघोळ केल्याने त्यांचे संतुलन बिघडू लागते. म्हणूनच तुम्ही हे लक्षात ठेवले पाहिजे की, तुम्ही खूप गरम पाण्याने आंघोळ करू नये. कोमट पाण्याने आंघोळ केल्यास या समस्या टाळता येतील. मात्र अधिक तपशिलांसाठी तुम्ही नेहमी एखाद्या तज्ञाचा किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या...