कोरोना व्हायरसच्या माहामामारीने संपूर्ण देश प्रभावित झाला आहे. भारतात कोरोना रुग्णांची संख्या १० लाखांवर पोहोचली आहे. सर्वत्र भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. दरम्यान कोरोना व्हायरसच्या लसीबाबत सकारात्मक माहिती समोर येत आहे. तामिळनाडूमध्ये बीसीजी लसीचे ट्रायल सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे कोरोना विषाणूंमुळे वाढत असलेला मृत्यूदर कमी होण्यास मदत होईल.
मागील काही दिवसात मुख्यमंत्री ई पलानीस्वामी यांनी सांगितले की, बीसीजी लसीचे ६० ते ९५ वयोगटातील लोकांवर प्रयोग करून निरिक्षणाखाली ठेवलं जाणार आहे. वयस्कर लोकांमध्ये होणारं मृत्यूचं प्रमाण कमी करण्यासाठी हा प्रयोग केला जाणार आहे. तामिळनाडूचेआरोग्यमंत्री डॉं. विजय भास्कर यांनी अशी माहिती दिली आहे.
विजयभास्कर यांनी बुधवारी दिलेल्या माहितीनुसार तामिळनाडूमध्ये कोविड 19 चा मृत्यूदर कमी करण्यासाठी बेसिल-कॅलमेट-गुएरिन (बीसीजी) लसीचे परिक्षण केले जाणार आहे. नॅशनल इंस्टिट्यूटफॉर रिसर्च इन ट्यूबरकुलोसिस (NIRT) लवकरच या दिशेने आपले कार्यक्रम सुरू करणार आहे.
बीसीजी ही लस अनेक देशांमध्ये आजारांपासून वाचवण्यासाठी लहान मुलांना दिली जाते. बीसीजी लसीमुळे लहानपणापासूनच रोगप्रतिकारकशक्ती सुधारण्यास मदत होते. सध्या ६० ते ९५ वर्ष वयोगटातील लोकांना कोविड 19 मधून रिकव्हर होण्यासाठी ही लस मदतशीर ठरू शकते.
राज्य सरकारने मागील काही दिवसात वयस्कर लोकांमध्ये बीसीजीचा होणारा प्रभाव लक्षात यांवर अभ्यास करून आयसीएमआरकडून परवागनी मागितली होती. आयसीएमआरने आता या चाचणीसाठी परवानगी दिली आहे. NIRT मध्ये लवकरचे हे ट्रायल सुरू होणार आहे. या चाचणीदरम्यान वयस्कर लोकांवर कोरोनाचा संसर्ग होऊन रुग्णालयात भरती होण्याची वेळ येऊ नये तसंच मृत्यूदर कमी व्हावा असा दृष्टीकोन असणार आहे.
साधारणपणे गेल्या काही दिवसात मृत्यू झालेल्या लोकांमध्ये वयस्कर लोकांचा समावेश जास्त प्रमाणात आहे. त्यांना डायबिटीस, हाई बीपी आणि हृदयासंबंधी समस्यांचा सामना करावा लागल्यामुळे कोरोना संक्रमण होऊन मृत्यूचा सामना करावा लागतो. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार बीसीजी लसीपासून कोरोना विषाणूंपासून बचाव होऊ शकते. याचे कोणतेही पुरावे सापडलेले नाहीत.
त्वचेवरचे 'ते' डाग असू शकतात कोविड 19 चे लक्षणं; कोरोना संसर्ग झाल्यास जाणवतो असा त्रास
कोरोना विषाणूंचा रहस्यमय हल्ला; वेगवेगळं राहत असूनही ३५ दिवसात ५७ लोकांना कोरोनाची लागण