शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
3
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
4
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
5
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
6
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
7
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
8
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
9
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
10
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
11
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
12
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
13
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
14
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
15
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
16
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
17
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
18
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
19
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
20
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत

सावधान! पावसाळ्यात मशरुम खाण्याचा विचारही करू नका, तुमचे आरोग्य येईल धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2021 5:43 PM

मशरूम खाणे आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे. मात्र, पावसाळ्यात मशरूमवर जीवाणू वाढतात. त्यामुळे विशेष करून या हंगामात आपण मशरूम खाणे पूर्णपणे टाळले पाहिजे.

पावसाळा सुरु झाला म्हणजे आजारांची जंत्री सुरु होते. त्यामुळे पावसाळ्यात आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे अधिक गरजेचे बनून जाते. पावसाळ्यात पोटदुखी आणि विषबाधा होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळेच डॉक्टर पावसाळ्यात उघड्यावरील खाद्यपदार्थ खाणे पुर्णपणे टाळण्यास सांगतात. कारण बॅक्टेरियाने संक्रमित अन्न खाल्ल्यास विषबाधा, सूज येणे, अतिसार, उलट्या इत्यादी आजार बळावण्याची शक्यता वाढते.

मशरूम खाणे आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे. मात्र, पावसाळ्यात मशरूमवर जीवाणू वाढतात. त्यामुळे विशेष करून या हंगामात आपण मशरूम खाणे पूर्णपणे टाळले पाहिजे. या काळात हवेतील जास्त आर्द्रतेमुळे कीटक आणि जीवाणू मशरूमवर लवकर वाढतात. ते आपल्या डोळ्यांना पटकन दिसत नाहीत. मात्र, यामुळे पोटदुखीची समस्या निर्माण होऊ शकते. तसेच मशरुम खल्ल्याने ज्यामुळे आपल्याला आरोग्याच्या विविध समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. म्हणून, पावसाळ्यात मशरूम खाणे टाळा. 

मानवी शरीरासाठी व्हिटॅमिन डी ची खूप आवश्यकता असते. याची कमतरता जाणवू लागल्यास वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे कारण यामुळे आपल्याला, अनेक आजारांचा सामना करावा लागू शकतो. असं असलं तरी व्हिटॅमिन डी खूप कमी भाज्यांमध्ये सापडते. यापैकी मशरूम एक आहे. मशरूममध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन डी असते. यामुळे शरीराची व्हिटॅमिन डी ची गरज पूर्ण होते.पांढऱ्या आणि पोर्टेबेला प्रकारच्या मशरूममध्ये याचं प्रमाण सर्वाधिक असते. त्यामुळे आहार तज्ज्ञ देखील मशरूमला दैनंदिन आहारात समाविष्ट करण्याचा सल्ला देतात. मात्र, पावसाळ्यात मशरूम खाणे टाळले पाहिजे, असा सल्ला देखील तज्ज्ञमंळी देतात. मशरूम अगदी सहजपणे बाजारात उपलब्ध होतात. त्याचे वेगवेगळे पदार्थ तयार करण्याची पद्धत देखील अगदी साधीसोपी आहे. खूप कमी वेळेत मशरूमचे सलाड, भाजी किंवा सूप तयार करता येते.

 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स