कोरोनाच्या गंभीर परिस्थीतीमुळे आपण प्रत्येकजण जास्त काळजी घेत असाल. अगदी घरी असतानाही हात धुणे, सॅनिटाईज करणे आदी गोष्टी तुम्ही पाळत असाल. सध्या निर्बंध काही प्रमाणात शिथिल झाल्याने तुम्ही हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये जात असाल. पण अशाचवेळी जास्त काळजी घेण्याची गरज आहे. हॉटेलमध्ये पदार्थांचा आस्वाद घेणं तुमच्या आरोग्याला महागात पडू शकतं. कारण, रेस्टॉरंटमध्येही अनेक ठिकाणी कोरोना व्हायरस लपलेला असू शकतो. चला जाणून घेऊया रेस्टॉरंटमध्ये कुठे लपलेला असू शकतो कोरोना व्हायरस.दरवाज्याच्या हँडलवररेस्टॉरंटमध्ये प्रवेश करताना विशेष सतर्क रहा. तुम्ही जो दरवाजा उघडत आहात त्याच्या हँडलवर कोरोनाचा विषाणू असु शकतो. त्यामुळे शक्यतो तुमच्याकडील स्वच्छ हातरुमाल वापरुन तुम्ही रेस्टॉरंटचा दरवाजा खोला.
टेबल आणि खुर्चीवरतुम्ही रेस्टॉरंटमध्ये प्रवेश केल्यावर टेबल आणि खुर्ची सॅनिटाईज केलेली आहे ना याची खात्री करून घ्या. नसल्यास त्वरित सॅनिटाईज करण्याची विनंती करा. रेस्टॉरंटमधील टेबलावर ठेवलेल्या टिश्यु किंवा टॉवेलला हात लावू नका. त्याऐवजी स्वत:जवळील रुमाल वापरा.
रेस्टॉरंटमधील मेन्युकार्डावरजेव्हा वेटर तुम्हाला खाण्याची ऑर्डर देण्यासाठी मेन्युकार्ड देईल त्याआधी ते सॅनिटाईज केलेले आहे ना याची विचारणा करून घ्या. तुमच्या हाती दिले जाणारे मेन्युकार्ड इतर कोणाच्याही स्पर्श करून तुमच्याकडे आलेले असु शकते त्यामुळे सावधान!
टॉयलेटमध्येरेस्टॉरंटमधील टॉयलेटमध्ये जाताना विशेष काळजी घ्या. फ्लश, टिश्यु पेपर, शॉवर आदींना हात लावताना काळजी घ्या किंवा टॉयलेटमधून बाहेर आल्यावर लगेच हात सॅनिटाईज करून घ्या. हे टॉयलेट अनेकांना वापरलेले असू शकते त्यामुळे विशेष काळजी घेणे महत्वाचे आहे.
वॉशबेसीनच्या नळावरवॉशबेसिनच्या नळाला हात लावताना विशेष काळजी घ्या. अनेकांनी हात धुतल्यामुळे यावर कोरोना व्हायरस असण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे विशेष काळजी घ्या.