शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांना बसणार मोठा झटका! 'तुतारी हाती घ्यायची का?', रामराजेंना कार्यकर्त्यांनी दिला 'होकार'
2
"पिझ्झा घेऊन पोलीस स्टेशनमध्ये जाता, ही मस्ती घरी दाखवायची"; सुप्रिया सुळेंची सुनील टिंगरेंवर जहरी टीका
3
"मोदींनी भाषण करण्यापूर्वी थोडा..."; संजय राऊतांनी पंतप्रधानांना पाटील, राठोडांवरून घेरलं
4
धक्कादायक! श्री रामची भूमिका साकारताना स्टेजवरच हृदयविकाराचा झटका, लाइव्ह परफॉर्मन्स दरम्यान मृत्यू झाला
5
गाझातील मशिदी आहेत 'हमासचा अड्डा'? इस्रायल बनवतोय निशाणा, एअर स्ट्राइकमध्ये अनेकांचा मृत्यू
6
चुकीच्या दिशेने आलेल्या टेम्पोची कारला जोरदार धडक; माय लेकरांसह चौघे ठार, तिघे गंभीर
7
EPF च्या पैशाने होमलोनची परतफेड करणे योग्य आहे का? समजून घ्या हिशोब
8
आता नेतन्याहू फ्रान्सवर भडकले! लेबनॉनमध्ये फ्रेन्च कंपनीवर इस्रायची बॉम्बिंग, नेमकं काय घडलं?
9
काँग्रेस आमदार हिरामण खोसकर अचानक शरद पवारांच्या भेटीला; कारण आले समोर
10
बच्चू कडूंना CM शिंदेंनी दिला जबर झटका! प्रहारचा 'हा' आमदार शिवसेनेत करणार प्रवेश?
11
चेंबुरमध्ये पहाटे अग्नितांडव; चाळीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू
12
"त्यांना लाज वाटली पाहिजे", पंतप्रधान नेतन्याहू फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर भडकले
13
दुकानातल्या रॉकेलने केला घात; छेदिराम गुप्तांनी पत्नी, मुलगा, सून नातवडं सर्वांनाच गमावलं
14
Women's T20 World Cup Points Table- भारताच्या गटात न्यूझीलंड ऑस्ट्रेलियाचा दबदबा
15
पाकिस्तानमध्ये मोठं काय घडणार? अमेरिकेने नागरिकांसाठी ॲडव्हायजरी जारी केली
16
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
17
अल्लू अर्जुन नाही बॉलिवूडचा हा सुपरस्टार बनला असता 'पुष्पा', जाणून घ्या का नाकारला सिनेमा
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे
19
लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढता येईना; किरीट सोमय्या महिलांसह पोहोचले पोलीस ठाण्यात
20
जुन्नर विधानसभेतही शरद पवार धक्का देणार! नवं कार्ड बाहेर काढणार?; बेनकेंविरोधात 'हा' उमेदवार मैदानात उतरवणार

सावधान! या ५ गोष्टी तुमची झोप कायमची उडवतील!

By admin | Published: May 17, 2017 5:46 PM

आपली झोप उडवून शारीरिक-मानसिक आजारांना निमंत्रण नक्की कोण देतंय?

- निशांत महाजनजगभरात माणसांना सध्या झोपेची समस्या सतावते आहे. आपण कुणीही त्याला अपवाद नाही. शांत, सात ते आठ तास गाढ झोप ही तर आवाक्याबाहेरची गोष्ट वाटते अनेकांना. रात्रीचे बारा वाजून जातात तरी लोक झोपत नाहीत. काही झोपतात पण त्यांना झोपच येत नाही. काहींना अचानक जाग येते, विचित्र स्वप्न पडतात, भीती वाटते, दचकून जाग येते, उद्या करायच्या कामांची यादी सतत डोक्यात फिरते. शांत झोपच लागत नाही. असं तुमचं होतंय का? होत असेल तर बाकी स्ट्रेस, कामाचा लोड, लाइफस्टाईल यासह हे तपासून पहा की झोपण्यापूर्वी आपण काय करतो? काही अशा गोष्टी आहेत, ज्या आपण झोपताना करतो आणि त्यामुळेही आपली झोप उडते. आपल्या झोपेचं चक्र बिघडतं. आपल्याला शारीरिक आणि मानसिक विकार होवू शकतात. अनेकदा झालेलेही असतात पण आपल्या लक्षात येत नाही. तसं होवू नये म्हणून झोपताना या ५ गोष्टी टाळा. तुमची झोप नक्की ताळ्यावर येईल.

१) झोपण्यापूर्वी चहा-कॉफी?हल्ली फॅशनच आहे, जेवण झाल्यावर कॉफी पिण्याची. पण फॅशन घातक असू शकते. ठरते. झोपण्यापूर्वी जर चहा-कॉफी घेत असाल तर त्यानं तुमची झोप उडते. पचन क्रिया बिघडते. सकाळी पोट साफ होणं अवघड. डोकेदुखी त्रास देते. आणि झोप धड न लागल्यानं सकाळी चिडचिड होते, भूकेवर परिणाम होतो.२) टीव्ही/मोबाईल/कम्प्युटर/व्हॉट्सअ‍ॅप- ३० मिनिटं आधी बंदअंथरुणात पडल्यापडल्या फोन चार्जिंगला लावून फोनवर बोलणं, बेडरुममध्ये टीव्ही पाहणं, व्हॉट्सअ‍ॅप गप्पा, कम्प्युटरवर काम हे सारं जर तुम्ही करत असाल तर तुमची झोप उडणारच. मेंदू शांत होणारच नाही. ते टाळायचं तर झोपण्यापूर्वी किमान ३० मिनिटं आधी हे सारं बंद करुन लांब ठेवून द्या. मोबाईल उशाशी ठेवणं आणि रात्री जाग आल्यावर तो उघडून पाहणं हे तर महाघातक.३)तुडूंब जेवण, लगेच झोप?रात्रीचं जेवण कमीच करा. आणि जेवण झाल्या झाल्या काहीजण लगेच झोपायला जातात. हात धुतला की गेलेच झोपायला. ते टाळा. जेवणानंतर किमान तासाभरानं झोपा. अतीजेवण रात्री करणं चूकच.४) लाईट आॅन, झोप गॉन!रात्री झोपण्यापूर्वी किमान तासभर आधी घरातले मोठे दिवे बंद करा. मंद दिवे लावा. शांत प्रकाश, शांत-तरल म्युझिक, असं काही ऐका. तर झोप छान लागेल. भकभकीत दिवे जे रात्री बारापर्यंत चालू ठेवतात त्यांचा झोपेचा पॅटर्न हमखास बिघडतो.५) स्मोक करताय?झोपण्यापूर्वी एक सिगारेट अशी सवय अनेकांना असते. ती मोडा. सिगारेट ओढायची की नाही हा वेगळ्या चर्चेचा विषय. मात्र रात्री झोपण्यापूर्वी सिगारेट पिणं हे मेंदूला त्रासदायक असतंच. ते टाळा.