कानातून पिवळे पाणी वाहणे हा एक सामान्य समस्या आहे. मात्र, सामान्य असली तरीही याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही कारण वेळीच उपचार न झाल्यास त्याचे अनेक दुष्परिणाम होऊ शकतात. बहिरेपणा ही येऊ शकतो. जाणून घ्या लक्षणे आणि उपाय...कानातून पिवळे पाणी येण्याची कारणे
- प्रामुख्याने बॅक्टेरिया, वायरस आणि फंगल इन्फेक्शन होऊन कानातून पिवळे पाणी येते.
- सर्दी होणे, खोकला, टॉन्सिल्स, सायनस यांमुळे नाक आणि घशातील बैक्टीरिया आणि वायरस हे कानात प्रवेश करून तेथे इन्फेक्शन निर्माण करतात त्यामुळे कानातून पिवळे पाणी येते.
- कानाच्या बाह्य भागात जखम होणे, कानात काडी, पेन्सिल इ. तत्सम वस्तू घालण्याच्या सवयीमुळे कानाच्या पडद्याला इजा होऊन कानातून पिवळे पाणी येते.
- वायू प्रदूषण, अॅलर्जी आदी कारणेही कानातून पिवळे पाणी येण्यास कारणीभूत ठरतात.कानातून पिवळे पाणी वाहत असल्यास दुर्लक्ष करू नका...
- कानातून पिवळे पाणी, पू यासारखे स्त्राव येत असल्यास, कान दुखायला सुरवात झाल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता लागलीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. वेळीचं उपचार न केल्यास हे अनेक गंभीर आजारांना निमंत्रण देते.
- कानाभोवतीचा महत्त्वाचा भाग म्हणजे मेंदू. मेंदूत हे कानातील इन्फेक्शन पसरल्यास मेंदूला सूज येणे, चक्कर येणे, मेंदूज्वर अशा गंभीर विकार उद्भवतात.
- त्यामुळे कानातून पिवळा स्त्राव येत असल्यास त्यावर त्वरित उपचार करणेच योग्य ठरते.
कानातून पिवळे पाणी वाहण्यावर उपचार
- औषधाने कानातील संसर्ग नियंत्रणात आणता येतो.
- जास्तीतजास्त पाणी प्या. यामुळे कानातून पिवळे पाणी येण्याच्या आजारातून काहीसा दिलासा मिळेल.
- तुम्हाला बाहेरील ससंर्गामुळे कानातून पिवळे पाणी येत असल्यास डॉक्टर कान साफ करून देतात.
- हा त्रास जास्त काळासाठी राहिला तर डॉक्टर अँटिबायोटीक्सही देऊ शकतात
- अत्यंत गंभीर परिस्थीतीत कानाची सर्जरीही केली जाऊ शकते.
कशी घ्याल कानाची काळजी?
- सर्दी, खोकला होणे, टॉन्सिल्सच्या तक्रारी टाळण्यासाठी थंडगार पदार्थ खाणे टाळा, थंडगार एसीत बसू नका.
- आंघोळ करताना पाणी कानात जाणार नाही याची काळजी घ्या. यासाठी छोट्याशा पॉलिथिन पिशवीने कान झाकावा.
- आंघोळीनंतर कान कोरड्या फडक्याने पुसा.
- कानात काडी, पेन्सिल यासारख्या वस्तू घालणे टाळा.
- वारंवार कान खाजवणेही टाळा.
- डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कानात कोणतेही औषध घालू नका.
- कानातून पिवळे पाणी, पू यासारखे स्त्राव येत असल्यास, कान दुखायला सुरवात झाल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता लागलीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.