शाकाहारी व्हा...४ वर्षे अधिक जगा!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2016 11:43 AM
जर कुणी जवळपास १७ वर्षांपासून शाकाहारी असेल, तर साडेतीन वर्षांनी आयुष्य वाढते,
तुम्ही जर शाकाहारी असाल, तर तुम्हाला चार वर्षे अधिक आयुष्य लाभेल, असे तज्ज्ञांचे मत आहे. जर कुणी जवळपास १७ वर्षांपासून शाकाहारी असेल, तर साडेतीन वर्षांनी आयुष्य वाढते, असे एका अभ्यासानुसार समोर आले आहे.१५ लाखांहून अधिक लोकांच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे की, अधिकाधिक लोकांचा मृत्यू हा दररोज मांसाहारामुळे होतो. दक्षिण-पश्चिम अमेरिकेतील अॅरिझोना राज्यातील मायो क्लिनिकमधील तज्ज्ञांनी एकूण ६ अभ्यासांअंती अहवालामध्ये मांसाहार आणि शाकाहारी अन्नाचा मृत्यू दरावरील परिणामांचा अभ्यास केला आहे.मात्र, अमेरिका आणि युरोपियन लोकसंख्येच्या अभ्यासादरम्यान थोडे वेगळे पाहायला मिळाले. मांसाहार केल्यास मृत्यू दरात वाढ झाली. विशेषत: प्रक्रिया केलेला मांसाहार खाल्ल्याने ही भीती अधिक वाढते. धक्कादायक म्हणजे हृदय रोगासारख्या रोगांची भीतीही वाढते. या साºया अभ्यासावरुन डॉक्टरांनी रुग्णांना मांसाहारापेक्षा शाकाहारी अन्न खाण्याचा सल्ला दिला पाहिजे, असे या अभ्यासातील महत्त्वाचे संशोधक प्रा. लॉरेन्ट यांनी सांगितले.