Black Underarms : काही महिलांना स्लीव्हलेस ड्रेस घालण्याची इच्छा असूनही ते परिधान करता येत नाहीत. अनेकदा डार्क अंडरआर्म्समुळे हे शक्य होत नाही. अशावेळी अंडरआर्म्सचा काळपटपणा घालवण्यासाठी महिलांची धडपड सुरु असते. अंडरआर्म्समध्ये काळे डाग का पडतात हे जाणून घेणे आधी महत्वाचे ठरते. चला जाणून घेऊया याची कारणे आणि त्यावरील उपचार...
या कारणांनी अंडरआर्म्स होतात काळे
- वेळोवेळी अंडरआर्म्सची स्वच्छता न करणे
- वेळेवर अंडरआर्म्सचे केस क्लीन न करणे
- चुकीचे डिओ वापरल्याने
- अधिक घट्ट कपडे परिधान करणे
- कशातरी इन्फेक्शनमुळे
- स्मोक केल्याने संपूर्ण शरीरावर प्रभाव पडतो, ज्यात अंडरआर्म्सचाही समावेश होतो.
चला जाणून घेऊया यावरील उपाय
१) अंडरआर्म्स शेव्ह करु नका तर वॅक्सिंग करा. यामुळे काळे डाग पडत नाही आणि त्वचा मुलायम राहते.
२) जे सूट होत नाहीत ते डिओड्रंट काखांमध्ये कधीच लावू नका. त्यामुळेही काखा डार्क होतात.
३) बटाट्याचा रस काढा आणि १० मिनिटे काखेत चोळा.
४) लिंबूचे छिलके काखेत लावल्यानेही काळा रंग निघून जाण्यास मदत होते. यामुळे त्याठिकाणची मृत त्वचाही निघून जाण्यास मदत होते.
५) काकडीमध्येही ब्लिचींग एजंट असतात. काकडीच्या रसात थोडा लिंबूरस आणि हळद मिसळा. या पेस्टला ३० मिनिटे लावून ठेवा. हळूहळू रंग उजळण्यास मदत होईल.
6) बेकिंग सोडा पाण्यात मिसळा आणि त्याची हलकी पेस्ट बनवा. या पेस्टने काखेमध्ये स्क्रब करा. आठवड्यातून दोनवेळा याचा प्रयोग करा.
7) प्रमाणापेक्षा जास्त घट्ट कपडे परिधान केल्यास अंडरआर्म्सची स्कीन काळी पडते. घट्ट कपड्यांमुळे घर्षण होतं, जे इन्फेक्शनमध्ये बदलतं. त्यामुळे जास्त घट्ट कपडे वापरु नका.