शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
3
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
4
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
5
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
6
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
7
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
8
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
9
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
10
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
11
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
12
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

Bed availability live tracker : बेड शोधण्यासाठी तुमचीही होऊ शकते धावपळ;  एका क्लिकवर मिळवा बेड मिळवण्याबाबत संपूर्ण माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2021 3:06 PM

corona patients bed availability live tracker link : अचानक रुग्णाची स्थिती गंभीर झाली तर काय करायचं? कोणाची मदत मागायची? बेड कधी, कुठे मिळणार असे प्रश्न लोकांसमोर असतात. आ

राज्यात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची स्थिती  खूपच गंभीर आहे.  रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे रुग्णालयांमध्ये बेड उपलब्ध नसल्याचं दिसून येत आहे. मोठ्या संख्येने सापडणाऱ्या या रुग्णांना बेड (Availability of Bed For Corona Patients) मिळणे कठीण झालं आहे.

अचानक रुग्णाची स्थिती गंभीर झाली तर काय करायचं? कोणाची मदत मागायची? बेड कधी, कुठे मिळणार असे प्रश्न लोकांसमोर असतात. आता मुंबईतील प्रशासनाने रुग्णालयातील बेडची उपलब्धता घरबसल्या तपासण्यासाठी एक लिंक तयार केली आहे. ज्याद्वारे आपल्याला नेमका कोणत्या रुग्णालयात बेड उपलब्ध आहे, याची माहिती मिळेल.

बृहन्मुंबई महानगरपालिकेने शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सादरीकरणात सांगितले की, येत्या आठवड्यात शहरातील जवळपास दिडशेपेक्षा जास्त रुग्णालयांमधील बेडची संख्या सध्याच्या २०५०४ बेडवरून २२००० करण्यात येईल, तर सध्या ४१२२ बेड उपलब्ध असल्याची माहिती दिली. महापालिका प्रशासनाकडून रुग्णांना डॉक्टरांच्या नियमित देखरेखीखाली जंबो कोरोना केंद्रामध्ये दाखल करण्याचे आवाहन केले आहे. 

वैद्यकीय प्रयोगशाळांनाही 24 तासात कोरोना चाचणी रिपोर्ट जाहीर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याशिवाय >> https://mumgis.mcgm.gov.in/Resources/COVIDBeds/bedTracker.html.<< दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपण माहिती खाटांची माहिती घेऊ शकतो. ही लिंक दर 2 तासांनी अपडेट केली जात असते.

या २ कारणांमुळे वेगानं होतोय कोरोनाचा प्रसार; AIIMS च्या संचालकांनी सांगितली मोठी कारणं

दरम्यान गेल्या २४ तासात मुंबईत ८ हजार ८३४ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या ५ लाख ७० हजार ८३२ झाली आहे. सध्या ८७ हजार ३६९ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर एकाच दिवसात ५२ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. वाढत्या कोरोनाबाधित रुग्णांप्रमाणे मृतांचा आकडाही वाढतो आहे.आतापर्यंत कोरोनामुळे १२ हजार २९४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.कोरोनाबाधितांची संख्या जरी वाढत असली तरी मुंबईत दिवसभरात कोरोनावर ६ हजार ६१७ रुग्णांनी मात केली आहे. 

पॉझिटिव्ह आल्यापासून उपचारांपर्यंत; लवकर बरं होण्यासाठी कोरोनाबाबत या गोष्टी माहीत करून घ्या

आतापर्यंत एकूण ४ लाख ६९ हजार ९६१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यानुसार मुंबईत कोरोना रुग्णांचा बरे होण्याचा दर हा ८२ टक्के आहे. मुंबईत एकूण ४७ हजार २५३ कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत एकूण ४ कोटी ८ लाख ९९ हजार ५ कोरोना चाचण्या करण्यास दिल्या आहेत. १० ते १६ एप्रिलपर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर १.५७ टक्के असल्याची नोंद आहे. तर रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ४४ दिवसांवर गेला आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealth Tipsहेल्थ टिप्सMumbaiमुंबईMumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिका